Connect with us

मराठी कलाकार

आनंद शिंदे वळतायतं दिग्दर्शनाकडे। सिनेमा ‘नंदू नटवरे’

Nandu Natvare marathi movie anand shinde

News

आनंद शिंदे वळतायतं दिग्दर्शनाकडे। सिनेमा ‘नंदू नटवरे’

‘नवीन पोपट हा’, ‘गणपती माझा नाचत आला’ अशा गाण्यांनी प्रेक्षकांच्या हृदयावर गायक आनंद शिंदे यांनी अधिराज्य गाजवलं. त्यांच्या आवाजातील जादूने त्यांनी सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केलं. हेच महाराष्ट्राचे लाडके गायक आनंद शिंदे आता दिगदर्शन क्षेत्रात उतरत आहेत. साई इंटरनॅशनल फिल्म्स आणि शिंदेशाही फिल्म्स सादर असलेला नंदू नटवरे ह्या सिनेमाचं दिगदर्शन आनंद शिंदे करत आहेत. चित्रपट विनोदी धाटणीचा असून शुटिंगच काम लवकरचं सुरु होत असल्याचं कळतंय. नुकतंच सिनेमातील एक लोकगीत गाऊन सिनेमाचा मुहूर्त साधण्यात आला. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे गीत स्वतः आनंद शिंदे ह्यांनीच गायलं आहे.

Nandu Natvare marathi movie anand shinde

सिनेमाबाबत बोलायचं झालं तर ह्याला संगीत हे आदर्श शिंदे आणि उत्कर्ष शिंदे यांचं आहे. आणि सिनेमाची निर्मिती उमेश जाधव, अरविंद अडसूळ, विजय जगताप, शम्भु ओहल आणि ‘साई ऍग्रो टेक’ हे करत आहेत. सिनेमात असलेली आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे सिनेमाचा नायक हा दुसरा तिसरा कुणी नसून आनंद शिंदेंचा मुलगाच आहे. हो! उत्कर्ष शिंदे ह्या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करतो आहे. अजूनही बऱ्याच ताऱ्यांची नावेही लिस्ट मध्ये असण्याची शक्यता आहे पण ती अजून उघड झालेली नाहीत. पहिल्याच सिनेमातून अभिनयात पदार्पण करणारा मुलगा आणि दिगदर्शन क्षेत्रातला पहिलाच सिनेमा करणारे त्याचे वडील ह्यांची कमाल आपल्याला नंदू नटवरे मधून लवकरच दिसेल.

Continue Reading
Advertisement
You may also like...
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in News

To Top