Connect with us

मराठी कलाकार

“9 years of क्षणभर विश्रांती”.पहा काय म्हणाला सिद्धार्थ जाधव.

News

“9 years of क्षणभर विश्रांती”.पहा काय म्हणाला सिद्धार्थ जाधव.

एक मराठी चित्रपट दिनांक ९ एप्रिल २०१० रोजी प्रदर्शित झाला होता, आणि त्या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मल्टी स्टार्रर असलेल्या ह्या चित्रपटाला नुकतीच ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. पण एक मिनिट, एव्हाना आम्ही तुम्हाला या चित्रपटाचं नावंच सांगितलं नाहीये, ‘क्षणभर विश्रांती’ हे चित्रपटाचं नाव असून रसिकांचं हलकंफुलकं मनोरंजन करण्यात यशस्वी राहिला होता.

‘क्षणभर विश्रांती’ ला नुकतीच ९ वर्षे पूर्ण झाली आहेत या निमित्ताने अभिनेता सिद्धार्थ जाधवने सोशल मीडियावर या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सिद्धार्थ जाधवने इंस्टाग्राम अकाउंटवर ‘क्षणभर विश्रांती’ चित्रपटाला ९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक कॉमेडी व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात या चित्रपटातील मुख्य भूमिकेत असलेले कलाकार दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करून सिद्धू म्हणाला की, ”क्षणभर विश्रांती’ची नऊ वर्षे साजरी करत आहोत.’ सिद्धार्थच्या या पोस्टमुळे या सिनेमाच्या सगळ्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत.

पूजा सावंतचा हा पहिलाच चित्रपट होता. सचित पाटील लिखित व दिग्दर्शित ‘क्षणभर विश्रांती’ चित्रपटात मैत्रीची गुंफण आणि त्यात खुलत जाणारे हळुवार प्रेम हे सगळे अगदी हलक्या फुलक्या पद्धतीने रेखाटण्यात आले आहे. यात सचित पाटील, हेमंत ढोमे, सिद्धार्थ जाधव, मौलिक भट्ट, सोनाली कुलकर्णी, मनवा नाईक, कादंबरी कदम, पूजा सावंत आणि भरत जाधव हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.

Comments

More in News

Like Us on Facebook

Popular Posts

To Top