Connect with us

मराठी कलाकार

एका रहस्यमय मृत्यूची उकल करणारा चित्रपट “आपला मानूस”

Movie Teaser

एका रहस्यमय मृत्यूची उकल करणारा चित्रपट “आपला मानूस”

मित्रांनो, नाना पाटेकर हे नाव सिनेविश्वाला चांगलचं सुपरिचित आहे. ९ फेब्रुवारीला नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका असलेला अजय देवगण निर्मित “आपला मानूस” हा नवीन मराठी चित्रपट येतोय. या चित्रपटाच्या पोस्टरवर वादळी रात्रीत नानाचा पावसात बाईक चालवतानाचा फोटो आहे. या फोटोवर हा ‘सैतान बाटलीत मावणार नाही’ असे कॅप्शन दिले असल्यामुळे चित्रपटाच्या या फर्स्ट लुकनंतर प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाविषयी उत्सुकता दुणावली आहे.

या चित्रपटात नाना पाटेकर हे गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्री.मारुती नागरगोजे ही भूमिका साकारत आहेत. टीझरच्या सुरवातीला आपल्याला दिसते कि रात्रीच्या वेळेस एक माणूस इमारतीवरून खाली पडतो मग सकाळी नाना पाटेकर बुलेटवर एन्ट्री करतात आणि घटनास्थळी पोहोचतात.

“आपला मानूस” ही शहरात राहण्याऱ्या तरुण दाम्पत्याची कथा आहे. हे दांपत्य त्यांच्या वडिलांसोबत राहत असते. ते नातेसंबंधांच्या गुंतागुंतीला समजून घेत असतांनाच ते शहरी जीवनशैलीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र त्यांच्या जीवनात एक अनपेक्षित प्रसंग घडतो जो त्याच्या आयुष्याची दशा आणि दिशा पालटतो.

नाना पाटेकर हा शब्द ऐकल्यावर कुठलीही सामान्य व्यक्ती या व्यक्तिमत्वाला दुर्लक्षित करू शकत नाही. मग चर्चा त्यांच्या जुन्या चित्रपटांबद्दल असो वा नव्या असो. तर सुरुवातीच्या काळातली नानाच्या त्या प्रतिमेची झलक या सतिश राजवाडे दिग्दर्शित “आपला मानूस” चित्रपटात बघायला मिळेल जो एका रहस्यमय आत्महत्येवर आधारित आहे. या चित्रपटात नाना पाटेकरसोबतच सुमित राघवन आणि इरावती हर्षे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसाच संवादाबद्दल बोलायचं झालं तर टिझरमध्ये एक से एक डायलॉग्स आहेत जसे कि

‘आपल्याला जमेल तेवढा चांगूलपणा दाखवावा, आपण काय गांधी नाही’, ‘तुमचंच नाही मी सगळ्यांचे स्टेटमेंट्स फाट्यावर मारतो’ इत्यादी.

अजय देवगण या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करतोय. या चित्रपटाबद्दल अजयने त्यांच्या ट्विटर हँडलवर रविवारी एक चित्रफीत (Video) पोस्ट केली आहे ज्यात तो म्हणतो की, ‘चित्रपट क्षेत्रात मला २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. प्रत्येक वेळी मी चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत मात्र तुमच्यासोबतचं नातं आजही तेच कायम आहे. “त्याचप्रमाणे, माझ्या जन्मापासून माझा महाराष्ट्राशी संबंध आहे. मला मराठी भाषेबद्दल नेहमी आदर राहिला आहे पण काजोलबरोबर लग्न केल्यानंतर मी मराठी भाषेच्या प्रेमात पडलो कारण मराठी संस्कृतीचा, मराठी सिनेसृष्टीचा स्वतःचा असा एक प्रेक्षकवर्ग आणि चाहते आहेत म्हणून यात सामील होण्यासाठी मी माझा पहिल्या मराठी चित्रपट ‘आपला माणूस’ घेऊन येत आहे.

एवढ्याने काय चेहरे पाडताय ! खरी गम्मत तर पुढेच आहे.

Comments

More in Movie Teaser

To Top