Connect with us

मराठी कलाकार

अभिजित बिचुकलेची घरात वापसी अशक्य?वाचा पूर्ण बातमी.

बिग बॉस मराठी

अभिजित बिचुकलेची घरात वापसी अशक्य?वाचा पूर्ण बातमी.

बिग बॉसच्या घरातील सर्वात गाजलेला स्पर्धक आणि सर्व महाराष्ट्रात चर्चित नाव असलेल्या अभिजीत बिचुकले याला सातारा पोलिसांनी चेक बाउन्सप्रकरणी अटक केली होती. अभिजीत बिचकुलेला गोरेगाव फिल्मसिटीतील ‘बिग बॉस’च्या घरात जाऊन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. साताऱ्यातील कोर्टात त्याला हजर करण्यात आलं होतं.

आता नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार, बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमधील चर्चित स्पर्धक अभिजीत बिचुकले यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचा बिग बॉसमध्ये परत येण्याचा मार्ग बंद झाला आहे. एबीपी माझाच्या रिपोर्टनुसार, अभिजीत बिचुकले मुंबईत बिग बॉस कार्यक्रम संपल्यावर फरार होऊ शकतो, असे कारण देत सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने अभिजीत बिचुकले यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. अभिजीत बिचुकले यांना चेक बाऊन्सप्रकरणी सातारा पोलिसांनी आरे पोलिसांच्या मदतीने २१ जूनला अटक केली होती.

एकमेव राजकीय नेता म्हणून अभिजीत बिचुकलेने ‘बिग बॉस मराठी 2’च्या घरात एन्ट्री घेतली आणि पहिल्याच दिवशी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. पहिल्या आठवड्यात घरातील सर्व स्पर्धकांनी बिचुकलेला टार्गेट केले. पण बिचकुले घरातील सगळ्यांना पुरून उरला. बिग बॉसच्या घरातील त्याचा वावर आणि त्याची भांडणे सगळेच चर्चेचा विषय ठरले. ‘बिग बॉस मराठी 2’ रंगात आला असताना गत २१ जूनला बिचुकलेला अटक झाली. सातारा पोलिसांनी एका जुन्या चेक बाऊन्स प्रकरणात त्याला बिग बॉसच्या घरातून अटक केली गेली होती.

Comments

More in बिग बॉस मराठी

To Top