Connect with us

मराठी कलाकार

“अभिजित बिचुकले”गुगल सर्च होतोय ट्रेंड!दिग्गजांना टाकलं मागे.

बिग बॉस मराठी

“अभिजित बिचुकले”गुगल सर्च होतोय ट्रेंड!दिग्गजांना टाकलं मागे.

अभिजित बिचुकले हे नाव सध्या कुणाला ठाऊक नसेल म्हटल्यावर नवलच म्हणावं लागेल. बिग बॉसच्या घरातील सर्वात गाजलेला स्पर्धक अभिजीत बिचुकले याला सातारा पोलिसांनी चेक बाउन्सप्रकरणी अटक केली होती. अभिजीत बिचकुलेला गोरेगाव फिल्मसिटीतील ‘बिग बॉस’च्या घरात जाऊन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. साताऱ्यातील कोर्टात त्याला हजर करण्यात आलं होतं.

पण दुसरीकडे अटकेची ही कारवाई बिचुकलेच्या चांगल्याच पथ्यावर पडली. गुगलवर अभिजीत बिचुकलेचा सर्च वाढला आहे. सर्चच्या बाबतीत त्याने ‘बिग बॉस मराठी 2’चे होस्ट महेश मांजरेकर यांनाही मागे टाकले. गुगल ट्रेण्डसच्या गत सात दिवसांच्या क्रमवारीत बिचुकलेचा सर्च वाढल्याचे दिसले. २१ जून म्हणजे, ज्या दिवशी त्याला अटक झाली, त्यादिवशी अभिजीत बिचकुले हे नाव सर्वाधिक सर्च केल्या गेले. सर्चच्या या शर्यतीत महेश मांजरेकर आणि अभिनेते व खासदार अमोल कोल्हे यांनाही त्याने मागे टाकले.

खंडणी प्रकरणातील तक्रारदार फिरोज पठाण यांनी खंडणीसंदर्भातील तक्रार मागे घेण्याबाबत सोमवारी सातारा जिल्हा आणि सत्र न्यायालयात अर्ज सादर केला. या अर्जावर आणि बिचुकले याच्या जामीनाच्या अर्जावर उद्या गुरूवारी सुनावणी होणार आहे. त्यानंतरच बिचुकले कारागृहातून बाहेर येणार का आणि मग बिग बॉसच्या घरात जाणार का या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे.

Comments

More in बिग बॉस मराठी

To Top