Connect with us

मराठी कलाकार

बिचूकलेंची फॅमिली बिगबॉसच्या घरात दाखल! तर पराग सुद्धा आलाय वापस.वाचा अधिक.

बिग बॉस मराठी

बिचूकलेंची फॅमिली बिगबॉसच्या घरात दाखल! तर पराग सुद्धा आलाय वापस.वाचा अधिक.

बिगबॉस मराठीच्या खेळात इतके दिवस आपल्या माणसांपासून दूर रहाणे अवघडच. आणि जेव्हा इतक्या दिवसांनी आपला माणूस आपल्याला भेटतो तेव्हाचा आनंद शब्दांत व्यक्त करणे कठीण होऊन बसते. असेच काहीसं सध्या घरातील सदस्यांबाबत होत आहे. बिग बॉस सदस्यांना त्यांच्या जवळच्या व्यक्तींना भेटण्याची संधी देत आहेत. नुकतीच अभिजित बिचुकलेच्या कुटुंबीयांनही बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली. यात अभिजितची आई, पत्नी आणि मुलं आलेली पाहिला मिळणार आहेत. पहिल्यांदा बिचुकलेचे फॅमिली फोटो समोर आला आहे. अभिजीत बिचुकलेला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. अभिजीत बिचुकलेने याआधी घरामध्ये अनेक वेळा त्याच्या पत्नीचा आणि मुलांचा उल्लेख केला आहे.

तर दुसरीकडे पराग कान्हेरेनेही त्याच्या सोशल मीडियावरुन “मी येणार” अशी पोस्ट टाकून उत्सुकता आणखी वाढवली होती. आता माञ प्राग नेमका कुठे येणार आहे हे स्पष्ट झाले आहे. पराग बिग बॉसच्या घरात परत येत नसून तो ‘कूक विथ पराग कान्हेरे’ नावाची किचन सिरीज घेऊन आपल्या भेटीला येतो आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन परागने ही माहिती दिली. परागने लिहीले आहे की, “मी येणार… सगळ्यांबद्दल बोलणार… असं काही दिवसांपूर्वी मी पोस्ट केलं आणि त्याचा सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने अर्थ लावला… असो… मी येणार म्हणता म्हणता तो दिवस येऊन ठेपलाय… मी येतोय माझ्या किचनसूत्रा या चॅनेलवर एक अनोखी सिरीज घेऊन…”

‘बिग बॉस मराठी’ सीझन २ मधील स्पर्धक पराग कान्हेरे वेगवेगळ्या कारंणामुळे चर्चेत राहिलेली व्यक्ती. एका टास्क दरम्यान परागने नेहाच्या कानाखाली मारली आणि माधव देवचक्के, वैशाली माडे व अभिजीत केळकर यांच्यासोबतही त्याची मारामारी झाली. त्यामुळे त्याला बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यानंतर पराग पुन्हा घरात परतणार अशी चर्चा रंगली होती.

Comments
Continue Reading
You may also like...

More in बिग बॉस मराठी

Like Us on Facebook

Popular Posts

To Top