Connect with us

मराठी कलाकार

अच्छा तर “यामुळे”अभिजीतने स्वतःला डांबल होतं अडगळीच्या खोलीत!बिगबॉस मराठी सिझन २.

बिग बॉस मराठी

अच्छा तर “यामुळे”अभिजीतने स्वतःला डांबल होतं अडगळीच्या खोलीत!बिगबॉस मराठी सिझन २.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना बिग बॉसकडून मागील आठवड्यामध्ये कठोर शिक्षा मिळाली. घरातील सदस्य बिग बॉसच्या वारंवार सूचनानंतर देखील नियमांचे उल्लंघन करताना दिसत होते. घरामध्ये झोपणे, कुजबुज करणे, नॉमिनेशनचे प्लानिंग करणे, माईक न घालणे इत्यादी आणि आता तर घरातील कॅप्टन अभिजीत केळकरने बिग बॉसच्या महत्वाच्या नियमाचे उल्लंघन केले. अभिजीतने स्वत:लाच शिक्षा दिली.

अभिजीतचे म्हणणे होते, घराचा कॅप्टन असून देखील माझ्याकडून चूक घडली. मी माईक चुकीच्या पद्धतीने घातला होता आणि यासाठी मी शिक्षा भोगली पाहिजे असे माझ्या मनामध्ये होते आणि म्हणूनच मी स्वत:ला अडगळीच्या खोलीमध्ये डांबून घेतले आणि एकदंरीतच आमच्या कडून ज्या चुका झाल्या, काही नियमांचे उल्लंघन झाले त्यामुळे तुम्ही शिधा बंद केला आणि तो पूर्ववत झाला नाही आणि त्यामुळे तो परत पूर्ववत व्हावा अशी त्याने बिग बॉसना विनंती केली.

तर दुसरीकडे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अचानक शिवानीच्या एन्ट्रीने सगळ्याच सदस्यांना धक्का बसला. बिग बॉस काहीही करू शकतात, आणि कोणतेही सरप्राईज देतात असे देखील सदस्यांचे म्हणणे पडले.माधव, नेहा आणि शिवानी एकमेकांसाठी पहिल्यापासूनच खास होते. त्यामुळे घरामध्ये आल्यावरच शिवानीने माधव आणि नेहाला तिच्या मनातील गोष्टी सांगितल्या. तिला एक गोष्ट खटकली आणि ती म्हणजे वीणा आणि शिव तिला नाही भेटले आणि बोलायला देखील नाही आले.

Comments

More in बिग बॉस मराठी

Like Us on Facebook

Popular Posts

To Top