Connect with us

मराठी कलाकार

पाहून कोणी म्हणणार नाही पण या अभिनेत्याचं वय वर्ष सत्तर आहे!

Actor

पाहून कोणी म्हणणार नाही पण या अभिनेत्याचं वय वर्ष सत्तर आहे!

मराठी सिनेसृष्टीला अनेक दिग्गज ताऱ्यांची देणगी मिळाली आहे. विजय भाटकर हे त्यापैकीच एक मोठ्ठ नाव. आज त्यांचा ६९वा वाढदिवस असून मराठी कलाकार टीम त्यानिमित्त बर्थडे स्पेशल आर्टिकल घेऊन आलीये. तर चला सुरु करूयात…

सत्तराव्या वर्षात पदार्पण जरी केलं असलं तरी त्यांचा चेहरा पाहून कोणीही त्यांना सत्तर वर्षांचे मानणार नाही असे मराठी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेते म्हणजे रमेश भाटकर. हॅलो इन्स्पेक्टर आणि कमांडर या मालिकांपासून ते माहेरची साडी, सवत माझी लाडकी असे एक से बढकर एक हिट सिनेमांतून रमेश भाटकरांनी आपला दमदार अभिनय साकारून स्वतःच वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचा जन्म ३ ऑगस्ट १९४९ ला झाला असून ते प्रसिद्ध गायक संगीतकार वासूदेव भाटकर यांचे चिरंजीव आहेत. रमेश भाटकरांना अजून दोन भावंडं असून त्यांचे बालपण मुंबईत गेले आहे. त्यांची अभिनयाची कारकिर्द रंगभूमीवरूनच सुरु झाली.अश्रूंची झाली फूले हे त्यांचे नाटक तर चांगलेच गाजले होते. तसेच केव्हा तरी पहाटे, अखेर तू येशीलच, राहू केतू, मुक्ता यांसारख्या अनेक नाटकात त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत. रमेश भाटकरांनी ९०हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले असून अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत.

माहेरची साडी, सवत माझी लाडकी हे तर त्यांचे मराठीतील सुपरहिट सिनेमे राहिले. तसेच त्यांनी आपली माणसं, अष्टविनायक, दुनिया करी सलाम यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. दामिनी ह्या मालिकेने त्यांना छोट्या पडद्यावर खूप प्रसिद्धी दिली. रमेश भाटकर यांच्या पत्नीचं नाव मृदूला भाटकर असून मुलाचं नाव हर्षवर्धन असे आहे.

Continue Reading
Advertisement
You may also like...
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Actor

To Top