Connect with us

मराठी कलाकार

सावळ्या विठ्ठलरुपी भुमिकेतील सचित पाटीलचा लूक तुम्ही पाहिलात का?

Actor

सावळ्या विठ्ठलरुपी भुमिकेतील सचित पाटीलचा लूक तुम्ही पाहिलात का?

अभिनेता सचित पाटील म्हणजे मराठीतील हँडसम हंक. सध्या महाराष्ट्राच्या लाडक्या विठूमाऊलीवर आधारित असलेल्या ‘विठ्ठल’ सिनेमाची चर्चा सर्वत्र रंगत आहे. सिनेमात विठ्ठलाची व्यक्तिरेखा कोण साकारतोय याविषयी सा-यांमध्येच अधिक उत्सुकता पाहायला मिळत होती. पण अखेर गुलदस्त्यातच असलेले नाव आज समोर आले असून विठ्ठल ही भूमिका अभिनेता सचित पाटील साकारणार आहे.

राजीव रुईया यांची कथा आणि दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर पोस्टर लाँच करण्यात आला असून सावळ्या विठ्ठलाचे मनोहारी रूप दाखवणाऱ्या या पोस्टरवर सचित पाटील आपणास पाहायला मिळत आहे. सचितचा हा विठ्ठल अवतार प्रेक्षकांना देखील भावतो आहे. सिनेमाची पटकथा रवींद्र पाटील यांची असून,संदीप दंतवते यांनी संवादलेखन केले आहे. आजच्या आधुनिक युगात देव आणि भक्त यांच्यामधील नातं सांगणारा हा सिनेमा १४ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

Comments

More in Actor

To Top