Connect with us

मराठी कलाकार

कधीही न साकारलेल्या भूमिकेत दिसणार अभिनेता शरद केळकर. केला “माधुरी” चा टिझर शेअर.

Featured

कधीही न साकारलेल्या भूमिकेत दिसणार अभिनेता शरद केळकर. केला “माधुरी” चा टिझर शेअर.

हल्लीच नवरात्रीच्या दिवसात “माधुरी” सिनेमाचा टीझर पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि या सिनेमाविषयीची कमालीची उत्सुकता वाढली. सिनेमाविषयी नवनव्या बातम्या बाहेर येत असतांना आता त्यात नवा बातमीची भर पडली आहे. एका सुंदर नात्याची गोष्ट सांगणा-या ‘माधुरी’ या चित्रपटात सोनाली कुलकर्णीसह अभिनेता शरद केळकरची पण महत्त्वाची भूमिका आहे. नुकतेच, शरद केळकरने त्याच्या सोशल मिडीया अकाऊंट्वरुन या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे आणि या टीझरमधून सिनेमातील त्याच्या लूकची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे.

याविषयी अधिक बोलताना निर्माते मोहसिन अख्तर यांनी म्हटले की, “शरदचं काम मी पाहिलंय आणि त्यामुळे माझ्या पात्राच्या ज्या गरजा आहेत त्यात शरद एकदम फीट बसतो. शरदचा अभिनय, त्याचा आवाज, त्याचा लूक या सगळ्या गोष्टी फार कमाल आहेत आणि ‘माधुरी’ मध्ये शरदने अप्रतिम काम केलंय आणि मुळात, प्रेक्षकांना त्याने या कधी नं साकारलेलं पात्रं पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील शरदचे काम पाहिल्यावर मला खात्री आहे की शरद मराठी सिनेमामध्ये एक छाप सोडेल इतका त्याचा अभिनय अप्रतिम आहे”.

आता ‘माधुरी’ चित्रपटातील शरदची आगळी-वेगळी भूमिका बघण्यासाठी प्रेक्षकांना येत्या ३० नोव्हेंबर वाट पाहावी आहे.

Comments

More in Featured

To Top