Connect with us

मराठी कलाकार

लवकरच हि मराठी अभिनेत्री झळकणार बॉलिवूड सिनेमात.

Actress

लवकरच हि मराठी अभिनेत्री झळकणार बॉलिवूड सिनेमात.

छोट्या पडद्यावरून आणि मराठी सिनेमाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री भाग्यश्री मोटेचं शेड्युल हल्ली खूपच बिझी झालंय. विविध मालिका आणि सिनेमांतून रसिकांपर्यंत पोचल्यानंतर आता ती बॉलिवूड मध्ये पदार्पण करण्यास तयार झाली आहे. हिंदीत नशीब अजमावणाऱ्या मराठी तारकांच्या यादीत आता भाग्यश्रीचा देखील लवकरच समावेश होणार आहे. सध्या भाग्यश्रीच्या हातात बरेच सिनेमे असल्याचंही काळात असून यावर्षी सलग तीन मराठी चित्रपटांद्वारे ती प्रेक्षकांसमोर आली आहे. त्यापैकी ‘पाटील’ आणि ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ हे दोन सिनेमे प्रदर्शित झाले असून, लवकरच तिचा ‘विठ्ठल’ हा सिनेमादेखील या वर्षाअखेरीस प्रदर्शित होत आहे.

ट्रायअँगल प्रॉडक्शन निर्मित या बॉलिवूड सिनेमाचे दिग्दर्शन हार्दिक गज्जर करणार असून, हा सिनेमा पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे यंदाचे वर्षाप्रमाणे आगामी देखील भाग्यश्रीसाठी खूप खास असणार आहे. गोजिऱ्या चेहऱ्याच्या भाग्यश्रीने आपल्या अभिनयाद्वारे मराठी प्रेक्षकांच्या मनात छाप पाडण्यास यश मिळवले आहे. त्यामुळे आता हिंदी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यास ती सज्ज झाली आहे.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Actress

To Top