Connect with us

मराठी कलाकार

तब्बल १०वर्षानंतर केलंय “या”अभिनेत्रीने फोटोशूट!दिसतेय खूपच सुंदर.

Actress

तब्बल १०वर्षानंतर केलंय “या”अभिनेत्रीने फोटोशूट!दिसतेय खूपच सुंदर.

काळासोबत स्वतःला मॉडर्न राहण्याची काळजी सिनेसृष्टीच्या मोठ्यामोठ्या लोकांना सुद्धा असते. करारी, कणखर ते सोज्वळ अशा वेवेगळ्या प्रकारच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त अभिनेत्री स्मिता तांबेला पहिल्यांदाच ग्लॅमरस रूपात सध्या नव्या फोटोशूटमूळे पाहायला मिळतंय. मेकओव्हर, लूक बदलणे, स्टाइल स्टेटमेंटमध्ये बदल करणे काळाची गरज असून प्रत्येक अभिनेत्री आज स्टाइल स्टेटमेंटविषयी सजग झाल्या आहेत. याच यादीत आता स्मिता तांबेचेही नाव सामिल झाले आहे.

“मी गेल्या दहा-बारा वर्षात अशा पध्दतीने स्वत:चे फोटोसेशन केले नाही. ज्या-ज्या भूमिका रंगवत गेले त्या-त्यावेळी सिनेमातल्या भूमिकेनूसार, पोस्टरसाठीच केवळ फोटो काढले आहेत. याशिवाय मी कधी ग्लॅमरस भूमिका साकारल्या नसल्याने माझे कधी ग्लॅमरस फोटोशूट माझ्या चाहत्यांसमोर आले नव्हते.”-स्मिता तांबे, अभिनेत्री

स्मिताने नुकतंच स्टनिंग फोटोशुट केलं असून करारी, कणखर ते सोज्वळ अशा वेवेगळ्या प्रकारच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणाऱ्या या सशक्त अभिनेत्रीला पहिल्यांदाच ग्लॅमरस रूपात ह्या फोटोशूटमूळे पाहायला मिळतंय. स्मिता तांबेच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात 2019 मध्ये अनेक नव्या गोष्टी घडतायत. त्याविषयी विचारल्यावर ती म्हणाली, “हो, यंदा वर्षाच्या सुरूवातीला माझं लग्न झाले. आणि त्यानंतर आयुष्यात खूप सकारात्मक बदल घडले. मी व्यावसायिक रंगभूमीवर खूप वर्षांनी ‘इडियट्स’ नाटकाव्दारे परतले.”

 

Comments
Continue Reading
You may also like...

More in Actress

Like Us on Facebook

Popular Posts

To Top