Connect with us

मराठी कलाकार

आणि स्वप्नील म्हणतो “आयला आला रे सचिन”.पहा का ते.

Video Songs

आणि स्वप्नील म्हणतो “आयला आला रे सचिन”.पहा का ते.

येत्या १ फेब्रुवारी रोजी ‘मी पण सचिन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्वप्निल जोशी या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसत असून चित्रपटात स्वप्निल ‘सचिन पाटील’ नावाच्या एका ध्येयवादी माणसाची भूमिका साकारत आहे. अशा या प्रेरणादायी चित्रपटातील ‘आयला आला रे सचिन’ हे जोषपूर्ण गाणं नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

गावातील बाजारात ‘आयला आला रे सचिन’ हे गाणं चित्रित करण्यात आले आहे. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात स्वप्नील आणि प्रियदर्शन या गाण्यात नाचताना आणि गाताना दिसत आहे. बाजारात असलेला गजबजाट आणि या गजबजाटात स्वप्निल ‘आयला आला रे सचिन’ म्हणताना दिसत आहे. पताके, ढोल, ताशे अशा एकंदरच जल्लोषाच्या वातावरणात गाणं चित्रीत झाले आहे. या गाण्यात बाजारातील भाजीवाले, लहान – मोठे दुकानदार, बॅण्डवाले, वासुदेव, लहान मुले असे एकंदरीत आनंददायी वातावरण आहे. सोबतच यांच्यासह सचिनचे पोस्टरही या गाण्यात झळकत आहे.

इरॉस इंटरनेशनलद्वारे ‘मी पण सचिन’ या चित्रपटाचे जागतिक स्तरावर देखील वितरण केले जाणार असून ‘आयला आला रे सचिन’ हे गाणं हर्षवर्धन वावरे, करण वावरे, आदित्य पाटेकर उर्फ त्रिनीती ब्रदर्स यांनी संगीतबद्ध केले आहे. नीता जाधव, गणेश गीते, संजय छाब्रिया आणि निखिल फुटाणे या चित्रपटाचे निर्माता असून श्रेयस जाधव यांनी लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटाच्या निमित्याने श्रेयस जाधव हे दिग्दर्शनात देखील पाऊल टाकत आहे. इरॉस इंटरनॅशनल आणि एव्हरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत आणि गणराज असोसिएट निर्मित ‘मी पण सचिन’ चित्रपट येत्या १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे.

Comments

More in Video Songs

To Top