Connect with us

मराठी कलाकार

‘अमर फोटो स्टुडिओ’ आता अमेरीकेच्या वारीला!

News

‘अमर फोटो स्टुडिओ’ आता अमेरीकेच्या वारीला!

अभिनेते सुनिल बर्वे यांनी आपल्या सुबक नाट्यसंस्थेच्यावतीने ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकाची निर्मिती केलेली आहे. महाराष्ट्रातील प्रेक्षकांना हे नाटक आवडलेले आहे. जे नाटक मुंबईत गाजते त्या नाटकाला अमेरिकेत बोलावणे येते. पुढच्या काही दिवसांत ‘अमर’ ची टीम अमेरिकेला रवाना होणार आहे. एक महिन्याच्या वास्तव्यात सात-आठ प्रयोग केले जाणार आहेत.

मराठी नाटक हे एका ठरावीक साच्यातले न राहता तांत्रिकदृष्ठ्या त्यात बदल दिसावा यासाठी काही दिग्दर्शकांना घेऊन सुनिलने परदेशवारी केली होती आणि आता त्याच्या ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकाचे अमेरिकेत प्रयोग होत आहेत. सुनिल बर्वेने मध्यंतरी काही जुन्या नाटकांची निर्मिती करून ठरावीक प्रयोगात ती नाटके प्रेक्षकांना पहाता येईल अशी सोय केली होती. त्या नाटकांना इतका प्रतिसाद मिळाला की प्रेक्षकांच्या आग्रहास्तव पुन्हा काही थिएटरमध्ये प्रयोग करावे लागले होते.

मराठी नाटकांच्या साचेबद्ध प्रवाहाला छेद देणारी जी नाटकं अधून मधून पण सातत्याने येत असतात त्यात ‘अमर फोटो स्टुडिओ’ हे नाटक मोडतं, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे ते आजची भाषा बोलतं, आजची रंगशैली प्रस्थापित करू पाहातं आणि उत्स्फूर्तपणे घडत राहातं (किंवा तसं वाटत राहातं). मजा मजा करत नकळत काही गंभीरही बोलू पाहातं. काळाची सरमिसळ ही आजच्या पिढीसाठी फार वेगळी कल्पना राहिलेली नाही. किंबहुना इंटरनेटवरच्या व्हर्च्युअल जगात वावरणाऱ्या पिढीची ती एक मानसिक गरजही बनलेली असू शकेल. पण हा डिव्हाइस वापरून या पिढीबद्दलच काही बोलण्याचा प्रयत्न हे नाटक करतं, हे विशेष आहे.

Comments

More in News

To Top