Connect with us

मराठी कलाकार

युथफूल “आम्ही बेफिकर”२९ मार्चला प्रदर्शित होणार.

Upcoming Movies

युथफूल “आम्ही बेफिकर”२९ मार्चला प्रदर्शित होणार.

खूप काही मिळवण्याचा प्रयत्नात खूप काही गमावले आणि त्याच गमावलेल्या अनुभवातून पुन्हा स्वप्न रंगवले या आशयसूत्रावर आधारित, आजच्या तरुणांशी संवाद साधणारा, त्यांच्या मनातले विचार पडद्यावर मांडणारा आणि त्यांच्याच भाषेत बोलणारा सिनेमा लवकरच आपल्या भेटीस येणार आहे. “आम्ही बेफिकर” असं ह्या सिनेमाचं नाव असून सुयोग गोऱ्हे आणि मिताली मयेकर ही नवी जोडी या चित्रपटात दिसणार आहे.

सुयोग आणि मिताली अनेक मालिका-चित्रपटांतून आपल्यापुढे आले आहेत. मात्र, ‘आम्ही बेफिकर’ हा त्यांचा एकत्रित पहिलाच चित्रपट आहे. त्यांच्यासह राहूल पाटील, स्वप्नील काळे आणि अक्षय हाडके यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. प्रणय अढांगळे यांनी चित्रपटाचे संगीत केले असून रोहित राऊत, हर्षवर्धन वावरे, कीर्ती किल्लेदार आणि सौरभ जोशी यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत. चित्तरंजन ढल यांनी कॅमेरामन म्हणून तर श्राधेय केदार, पंकज सळमुठे यांनी संकलक म्हणून काम पाहिले आहे.

प्रत्येकाला आपलासा वाटणारा ‘आम्ही बेफिकर’ २९ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येनार असून यानिमित्ताने मित्र-मैत्रिणी, धमालमस्ती, कॉलेजचं बेफिकिर आयुष्य हे सगळंच आता मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. आजपर्यंत कॉलेज जीवनावर आधारित अनेक चित्रपट येऊन गेले असले, तरी त्यात ‘आम्ही बेफिकर’ नक्कीच वेगळा ठसा उमटवेल अशी आशा बाळगायला हरकत नाही.

Comments

More in Upcoming Movies

Like Us on Facebook

Popular Posts

To Top