Connect with us

मराठी कलाकार

अमीर खान बनला थुरकटवाडीचा पाहुणा.स्वतःच्या अंदाजात मराठी स्किट केलं सादर.

News

अमीर खान बनला थुरकटवाडीचा पाहुणा.स्वतःच्या अंदाजात मराठी स्किट केलं सादर.

झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’कार्यक्रमाची हवाच काहीशी अलग आहे. प्रेक्षकांसाठी स्ट्रेस बस्टरचे काम करणारा, सोमवारी आणि मंगळवारी प्रेक्षक पोटभरून हसवणारा, छोट्या पडद्यावरचा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’. या मंचाची भूरळ केवळ मराठी सेलेब्रेटींना नाही तर बॉलिवूडलाही पडली आहे. या आधी या मंचावर थुकरटवाडीमध्ये शाहरुख खान, सलमान खान, जॉन अब्राहम, अक्षय कुमार, इरफान खान, अजय देवगण, रितेश देशमुख यासारख्या मंडळींने हजेरी लावली आहे

View this post on Instagram

The cutest in the world… mazi baiko ❤

A post shared by Aamir Khan (@_aamirkhan) on

आता दुसऱ्यांदा या मंचावर बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता आमिर खान आणि किरण राव येणार आहेत. ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही. आणि त्यांच्या बरोबर अमिर खान आणि किरण राव धम्माल करताना दिसणार आहे. हा भाग १ आणि २ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांआधी आमिर खानने त्याचा आणि किरणचा या लूकमधील फोटो सोशल मीडियावर टाकला आणि हा फोटो प्रचंड व्हायरल होतोय.

आमिर खान ने त्याच्या खास स्टाईलनं मंचावर येऊन सर्वच कलाकारांशी संवाद साधला. सेटवर लाडक्या विनोदवीरांनी रंगीला या चित्रपटावर एक स्कीट सादर केलं. एवढंच नाहीतर कार्यक्रमात आमिर खान आणि किरण राव या दोघांनी एक स्किट सादर केलं आणि त्यासाठी ते दोघंही गावकरी बनले. पाणी कसं वाचवावं आणि त्याचा साठा कसा करावा यावर माहिती देणारं स्किट आमिर खान आणि किरण राव यांनी सादर केलं आणि त्यासाठी त्यांनी मराठमोळा वेष परिधान केला.

Comments
Continue Reading
You may also like...

More in News

Like Us on Facebook

Popular Posts

To Top