Connect with us

मराठी कलाकार

महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता सुबोध भावे झळकणार “ह्या”मराठी सिनेमातून एकत्र.

News

महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता सुबोध भावे झळकणार “ह्या”मराठी सिनेमातून एकत्र.

मराठी चित्रपटसृष्टीत होणारे बदल, हाताळले जाणारे नाविण्यपूर्ण विषय यामुळे बॉलिवूडकरांमध्येही मराठी चित्रपटांची क्रेझ वाढली आहे. बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेते अमिताभ बच्चन यांनाही आता मराठी चित्रपटाने भुरळ पाडली असून लवकरच ते मराठी चित्रपटात झळकणार आहेत. ते ‘एबी आणि सीडी’ या मराठी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. नुकतीच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली असून या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पार पडला. काहीसा वेगळ्या विषयावर आधारीत ‘AB आणि CD’ हा सिनेमा असणार असल्याचं कळतं आहे.

‘AB आणि CD’ या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे कारण या चित्रपटात खुद्द बिग बी दिसणार आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने तब्बल २५ वर्षांनी बिग बी मराठी चित्रपटात काम करणार आहेत. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले मुख्य भूमिकेत दिसणार आहेत आणि त्यांच्यासोबत सुबोध भावेदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. डिजिटल मीडियावर नेहमीच नवनवीन उपक्रम घेऊन येणाऱ्या प्लॅनेट मराठी आणि अक्षय बर्दापूरकर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. मिलिंद लेले दिग्दर्शित ‘एबी आणि सीडी’ या सिनेमात अमिताभ बच्चन, विक्रम गोखले, सुबोध भावे, सायली संजीव आणि अक्षय टंकसाळे यांच्या भूमिका आहेत.

सुबोध भावे याने सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा फोटो शेअर करून अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगितले. तो म्हणाला की, ‘निर्विवादपणे ते अभिनयाचे शहेनशहा आहेत. त्यांच्या बरोबर काम करावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. माझेही होते आणि माझ्या मातृभाषेतील,मिलिंद लेले दिग्दर्शित ‘एबी आणि सीडी’ चित्रपटात ते साकार झाले. कलाकारांनी कसे असावे, कसे वागावे कसे रहावे आणि कसे काम करावे याचे ते मूर्तिमंत उदाहरण आहेत. मला ही संधी दिल्याबद्दल माझ्या टीमचे मनपूर्वक आभार.’

View this post on Instagram

निर्विवाद पणे ते अभिनयाचे शहेनशहा आहेत.त्यांच्या बरोबर काम करावं हे प्रत्येकाचं स्वप्नं असतं. माझंही होतं आणि माझ्या मातृभाषेतील,मिलिंद लेले दिग्दर्शित " AB आणि CD" चित्रपटात ते साकार झालं. कलाकारांनी कसं असावं कसं वागावं कसं रहावं आणि कसं काम करावं याचं ते मूर्तिमंत उदाहरण आहेत. मला ही संधी दिल्याबद्दल माझ्या टीम चे मनपूर्वक आभार. @planet.marathi #ABaaniCD

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on

Comments

More in News

Like Us on Facebook

Popular Posts

To Top