Connect with us

मराठी कलाकार

#अल्टिमेटफेनऑफअमृता’ स्पर्धेच्या विजेत्यांसोबत अभिनेत्री अमृता खानविलकर ने सेलिब्रेट केला बर्थ डे.पहा फोटोज.

Photos

#अल्टिमेटफेनऑफअमृता’ स्पर्धेच्या विजेत्यांसोबत अभिनेत्री अमृता खानविलकर ने सेलिब्रेट केला बर्थ डे.पहा फोटोज.

आपल्या अभिनयासह नृत्याने रसिकांच्या मनावर मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने अधिराज्य गाजवलं आहे. आज मालिका, डान्स रिअॅलिटी शोसह हिंदी आणि मराठी सिनेमातही मेहनतीच्या जोरावर तिचे एक अढळ स्थान निर्माण केलेल्या अमृता खानविलकरचा बर्थडे कालच सेलिब्रेट करण्यात आला. विशेष बाब म्हणजे अमृताने आपल्या फॅन्सबरोबर हा बर्थडे साजरा केला. काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम तसेच इतर सोशल नेटवर्किंग साईटवर घेण्यात आलेल्या अमृताच्या चित्रपटांमधील गाण्यांवर आधारित #अल्टिमेटफॅनऑफअमृता या स्पर्धेमध्ये विजेत्या झालेल्या स्पर्धकांना या पार्टीत बोलावण्यात आले होते. विशेष म्हणजे या विजेत्यांची निवड खास अमृतानेच केली होती.

‘गोलमाल’, ‘साडेमाडे तीन’, ‘नटरंग’, कट्यार काळजात घुसली, ‘झकास’, ‘धुसर’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘सतरंगी रे’, ‘बाजी’ अशा मराठी सिनेमात तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. उत्तम डान्सर असलेल्या अमृताच्या नृत्यावर रसिक फिदा आहेत. अमृताने डान्स रिअॅलिटी शोमध्येही आपल्या नृत्याची जादू दाखवली आहे. ‘नच बलिये’ या डान्स रिअॅलिटी शोचे जेतेपद पटकावल्यानंतर तिच्या डान्सने साऱ्यांनाच वेड लावलं. आज मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली जाते. यंदाचे वर्ष अमृतासाठी खूपच खास आहे. ‘राझी’, ‘सत्यमेव जयते’ या हिंदी सुपरहिट चित्रपटांमुळे आणि ‘डेमेज्ड’ या वेबसीरिजमुळे तिला बॉलिवूडमध्ये नवी ओळख प्राप्त झाली आहे. अमृताच्या या यशस्वी वाटचालीमध्ये तिच्या चाहत्यांनीदेखील मोलाची साथ दिली आहे. त्यामुळे या सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी यंदाचा वाढदिवस अमृताने खास आपल्या चाहत्यांसोबत साजरा केला. सांताक्रूझ येथील ताज हॉटेलमध्ये पार पडलेल्या या बर्थ डे पार्टीचा तिच्या चाहत्यांनी मनमुराद आनंद लुटला.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Photos

To Top