Connect with us

मराठी कलाकार

चॉकलेट बॉय अनिकेत विश्वासराव अडकणार लग्नाच्या बेडीत. संपन्न झाला साखरपुडा.

Actor

चॉकलेट बॉय अनिकेत विश्वासराव अडकणार लग्नाच्या बेडीत. संपन्न झाला साखरपुडा.

तब्बल एका दशकापूर्वी गाजलेल्या अल्फा मराठीवरील “नायक” मालिकेमुळे प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेला अभिनेता अनिकेत विश्वासरावचा साखरपुडा नुकताच संपन्न झाला. लवकरच अनिकेत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अनिकेतला कळत नकळत, एकापेक्षा एक, सुपर वुमेन यांसारख्या मालिकांमधून मराठी इंडस्ट्रीमध्ये चांगलंच ओळख मिळाली. याशिवाय लव्ह बर्ड, सुर्याची पिल्ले, नकळत सारे घडले या नाटकातही त्याच्या भूमिका गाजल्या. बघतोस काय मुजरा कर, पोस्टर बॉईज, पोस्टर गर्ल, नो एन्ट्री पुढे धोका आहे, फक्त लढ म्हणा यासारख्या चित्रपटात अनिकेत आपल्याला दिसला आहे.

अभिनेत्री स्नेहा चव्हाणसोबत अनिकेतचा साखरपुडा झाला असून विशेष म्हणजे त्यांचं लग्न हे अरेंज मॅरेज आहे. स्नेहाची आई आणि अनिकेतची मावशी एकमेकींच्या मैत्रिणी आहेत. या ओळखीतून दोघं भेटले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला असल्याचं कळतं आहे. स्नेहा मूळ पुण्याची आहे, तर अनिकेतचं बालपण मुंबईमध्ये गेलं. जून महिन्यातच अनिकेत आणि स्नेहाचं लग्न ठरलं होतं. रविवारी पुण्यात स्नेहा-अनिकेतचा साखरपुडा झाला. आगामी ‘हृदयात वाजे समथिंग समथिंग’ या चित्रपटात अनिकेत आणि स्नेहा चव्हाण एकत्र झळकणार आहेत.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Actor

To Top