Gossips
गाजावाजा न करता आज लग्नाच्या बेडीत अडकतेय ‘हि’ मराठी जोडी. पहा एक्सलूजीव फोटोज.
बॉलिवूड मध्ये दिपवीर, प्रियंका निक यांच्या लग्नाची धामधूम संपते ना संपते तोच इकडे मराठी सिनेसृष्टीतही आज एक जोडी लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याचं कळतंय.’चॉकलेट बॉय’ अभिनेता म्हणजेच अनिकेत विश्वासराव व अभिनेत्री स्नेहा चव्हाण आज विवाहबंधनात अडकणार असून याबाबतची माहिती त्यांनी गुलदस्त्यात ठेवली आहे. कुटुंब, जवळचे नातेवाईक व इंडस्ट्रीतील काही निवडक मित्रमैत्रिणींच्या उपस्थित हा विवाह सोहळा पार पडणार आहे. हा विवाहसोहळा कुठे होतो आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. त्यांचे शनिवारी व रविवारी मेंहदी व हळद सेरेमनी पार पडली. या सेरेमनीचे फोटो खुद्द स्नेहाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
View this post on InstagramSunshine 🌞 #day2 #haldi #astartwithnoend @wedding_wings_photography
A post shared by Sneha Chavan Vishwasrao (@mesnehachavan) on
आता या दोघांच्या लग्नातील फोटो कधी पाहायला मिळताहेत, याची चाहते वाट पाहत आहेत. ५ ऑगस्टला दोघांचा पुण्यातील हिंजवडी येथे साखरपुडा संपन्न झाला होता. हा साखरपुडा देखील कोणताही गाजावाजात न करता केला होता. त्यावेळी याबाबत स्नेहाला विचारले असता ती म्हणाली की, आमचे अरेंज मॅरेज आहे. आमचे अफेयर वगैरे काहीच नव्हते. तसेच आम्ही एकमेकांना डेटदेखील केले नव्हते. अनिकेतची मावशी आमच्या सोसायटीत राहते. तर मावशी व आई मैत्रीणी असल्यामुळे त्यांचे यासंदर्भात बोलणे झाले. मावशीने माझा अनिकेत नामक पुतण्या आहे. त्याच्यासाठीदेखील मुलगी बघत आहेत. त्याच्याशी बोलून पाहू का? आणि अशाप्रकारे आमच्या लग्नाबाबतचे असे अचानकच ठरले. माझी व त्याची आई एकमेकांशी बोलले. मग, आम्ही दोघे फोनवर बोललो. आम्ही विचार केला की अनोळखी व्यक्तीबरोबर लग्न करण्यापेक्षा आपण एकमेकांना ओळखतो व एकाच क्षेत्रातील आहोत तर लाइफ पार्टनर म्हणून एकमेकांचा विचार नक्कीच करू शकतो.
अनिकेत व स्नेहा हृद्यात वाजे समथिंग या चित्रपटात एकत्र झळकले होते.
