Connect with us

मराठी कलाकार

‘चला हवा येऊ द्या’मधील “ह्या”कलाकाराने उरकलं कोर्ट मॅरेज!वाचा अधिक.

News

‘चला हवा येऊ द्या’मधील “ह्या”कलाकाराने उरकलं कोर्ट मॅरेज!वाचा अधिक.

‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय आणि धमाल उडवून देणाऱ्या शोमधील अंकुर वाढवे विवाहबंधंनात अडकला आहे. शुक्रवारी 28 जूनला अंकुरचा लग्न पार पडलं. यवतमाळमध्ये अंकुरने कोर्ट मॅरेज केलं आहे. चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झालेल्या अंकुर वाढवेचा रिसेप्शन सोहळा त्याच्या विदर्भातील पुसद या राहत्या गावी होणार आहे.

अंकुर वाढवे एक उत्तम अभिनेता असून तो एक उत्तम कवी देखील आहे. त्याच्या ‘पुन्हा प्रेमगीत गाण्यासाठी’ या कवितासंग्रहाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले आहे. सुरुवातीला अभिनेते संजय नार्वेकर यांच्यासोबत एका नाटकात काम करण्याची संधी मिळाली. यानंतर करून गेलो गाव, गाढवाचं लग्न, सर्किट हाऊस ,आम्ही सारे फर्स्ट क्लास , सायलेन्स , कन्हैय्या यासारख्या दमदार नाटकात त्याने भूमिका साकारल्या आहेत.

‘जलसा’ या मराठी चित्रपटालाही तो एक भाग बनला. पुढे चला हवा येऊ द्या मध्ये छोटूच्या भूमिकेसाठी त्याची वर्णी लागली आणि अंकुर प्रत्येकाच्या घराघरात जाऊन पोहोचला. डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, योगेश सिरसाट या विनोदी कलाकारांसह अंकुर देखील या शोचा महत्वाचा भाग बनला आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय आणि धमाल उडवून देणाऱ्या शोमधील एक महत्वाचं पात्र आहे अंकुर वाढवे. शरीराची उंची जरी कमी असली तरी त्याच्या अभिनयाच्या उंचीचे कौतुक अनेक दिग्गज अभिनेत्यांनी केले आहे.

Comments
Continue Reading
You may also like...

More in News

Like Us on Facebook

Popular Posts

To Top