Connect with us

मराठी कलाकार

मराठीतही आता बोल्ड पोस्टर। सिनेमा कुठला हे अद्यापही गुपितंच

Marathi Madhe hi aata bold poster

News

मराठीतही आता बोल्ड पोस्टर। सिनेमा कुठला हे अद्यापही गुपितंच

हल्ली सिनेमांमधील बोल्डनेस अधिक अधिकच वाढत चालला आहे. बॉलिवूड मध्ये तर जणू याची स्पर्धाच लागलेली असते. पण आता ह्यात मराठी सिनेमासुद्धा मागे राहिलेला नाही. कारण सध्या चर्चेत आहे ते एका गुपित चित्रपटाचे बोल्ड पोस्टर. हे पोस्टर नेमके आहे कुठल्या सिनेमाचे हे अजूनही कळलेलं नाही. पण बॉलिवूड पाठोपाठ आता मराठी अभिनेत्रींचीसुद्धा बोल्ड सीन द्यायला काही हरकत नसल्याचं यावरून दिसते आहे. तूर्तास तरी पोस्टरवरून हा सिनेमा महेश मांजरेकरांचा आहे हे कळतंय. ह्या पोस्टरगर्लने मात्र पोस्टर सोशल मीडियावर शेअर झाल्यापासूनच सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. त्यात असलेल्या अभिनेत्रीच्या नावाबद्दल सध्या फक्त अंदाजच लावल्या जाऊ शकतात. पण सई ताम्हणकर, नेहा महाजन, नेहा जोशी ह्यांपैकी कोणीतरी अभिनेत्री असण्याची शक्यता जास्त आहे.

Marathi Madhe hi aata bold poster

२० एप्रिलला हा सिनेमा भेटीस येणार आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर रिलीज होत असल्याने पोस्टरवर ‘एप्रिल मध्ये हिट वाढणार’ अशी द्विअर्थी टॅगलाईन लिहिली आहे. याआधीही बोल्ड पोस्टर्सची चर्चा मराठी सिनेमांत होतीच. शटर, चित्रफित, न्यूड, गुलाबजाम ह्या सिनेमांची पोस्टर्स लक्ष वेधून घेणारच होती. आजवर काही मोजके सिनेमे सोडले तर मराठीतील पोस्टर्स शक्यतो साधीच बघायला मिळाली. हळूहळू त्याचे रंग आता बदलत चाललेले आता दिसत आहेत. सिनेमाच्या यशात पोस्टरचासुद्धा मोठा वाटा असतो. कदाचित हिच गोष्ट हेरून तर टिमने सिनेमाचं असं पोस्टर ठेवल्याचं दिसतंय.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in News

To Top