Connect with us

मराठी कलाकार

अभिनय बेर्डेची “अशी हि आशिकी” अभिनेत्री हेमल इंगळे करतेय सिनेमांत पदार्पण

News

अभिनय बेर्डेची “अशी हि आशिकी” अभिनेत्री हेमल इंगळे करतेय सिनेमांत पदार्पण

सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ हे मराठी सिनेसृष्टीचे चार महानायक! यांचा काळ या मंडळींनी प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य करत गाजवला. दुर्दैवाने मग आपण लक्ष्मीकांत बेर्डे ह्या ताऱ्याला गमवून बसलो. ह्या मंडळींची पुढची पिढी आता सिनेसृष्टीत स्थान घेऊ पाहतेय. सचिन पिळगांवकर ह्यांची मुलगी, महेश कोठारेंच्या मुलाने तर खूप आधीच अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलेलं आहे. आता दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांचा मुलगा अभिनय बेर्डे आपल्याला सिनेमांतून दिसणार आहे. “अशी हि आशिकी” असं ह्या सिनेमाचं नाव असून हा सचिन पिळगांवकरांचा प्रोजेक्ट आहे. प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांनी मागीलवर्षी 15 ऑगस्ट रोजी त्यांच्या वाढदिवशी नवीन चित्रपटाची घोषणा केली होती. यामध्ये सचिन यांनी त्यांचे घनिष्ठ मित्र दिवंगत लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेला साइन केले आहे. अभिनय बेर्डेचा हा दुसरा चित्रपट असून अभिनयने सतिश राजवाडेंच्या “ती सध्या काय करते” या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. आता ‘अशी ही आशिकी’मधून पुन्हा एकदा तो प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.

सिनेमाच्या शूटिंगला सध्या सुरुवात झाली असून सेटवरील काही फोटोज सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. यूथ लव्हस्टोरी असलेल्या या चित्रपटाच्या घोषणेवेळी सचिन यांनी अभिनेत्रीच्या नावाचा उलगडा केला नव्हता. पण आता त्यांना चित्रपटासाठी अभिनेत्री गवसली असून हेमल इंगळे हे तिचे नाव आहे. अभिनय आणि हेमल या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. हेमलचा हा पहिलाच चित्रपट आहे. अभिनेते जयवंत वाडकर यांचीही एक महत्त्वाची भूमिका असणार आहे.

Comments

More in News

Like Us on Facebook

Popular Posts

To Top