Connect with us

मराठी कलाकार

पुरग्रस्तांच्या मदतीला धावली “अश्रूंची झाली फुले”ची टीम.वाचा अधिक.

News

पुरग्रस्तांच्या मदतीला धावली “अश्रूंची झाली फुले”ची टीम.वाचा अधिक.

”फक्त पैसे देऊन काम संपणार नाही हे माहिती आहे पण किमान सुरवात होते हे महत्त्वाचं.सर्व मराठी कलाकार एकत्र येऊन पुढील काही दिवसात संकटात सापडलेल्या आमच्या बांधवांसाठी निश्चित आणि ठोस अशा जीवनावश्यक गोष्टी उपलब्ध करून देतील.अधिक माहिती पुढील २ दिवसात.” हि पोस्ट आहे मराठीतील अष्टपैलू अभिनेता सुबोध भावे याची. कोल्हापूर आणि सांगलीत आलेल्या पुराने मोठ संकट लोकांवर कोसळलं आहे. पुरग्रस्तांना सर्व स्तरातून मदत करण्याच आवाहन आता केलं जात आहे. या गावांच्या मदतीसाठी आता मराठी कलाकार पुढे सरसावले आहेत. अभिनेता सुबोध भावे याने मदतीचा हात पुढे केला आहे.

बातमी अशी आहे कि ‘अश्रूंची झाली फुले नाटका’च्या पुढच्या प्रयोगाचे संपूर्ण पैसे सुबोध आणि त्याची टीम पूरग्रस्तांना देणार आहे. कोल्हापूर आणि सांगलीकरांना मराठी नाट्य, चित्रपट आणि दूरचित्रवाणीवरील सर्व कलाकार नेहमीच तुमच्यासोबत आहोत असा विश्वास त्याने दिला आहे.

सदर पोस्ट शेअर करताना त्याने अश्रृंची झाली फुले या नाटकाचे पोस्टरही शेअर केलं आहे. ‘अश्रूंची झाली फुले नाटका’ या नाटकाच्या माध्यमातून सुबोध या लोकांपर्यंत मदत पोहचवणार आहे. थोडक्यात काय तर अभिनयात कौतुकास्पद कामगिरी केल्यानंतर सुबोध भावे आता खऱ्या आयुष्यात देखील नायकाप्रमाणे गरजू लोकांच्या मदतीला धावून आला आहे.

Comments

More in News

Like Us on Facebook

Popular Posts

To Top