Connect with us

मराठी कलाकार

समाजव्यवस्था, जडणघडण आणि अपराध हाताळणारा “अष्टवक्र”

News

समाजव्यवस्था, जडणघडण आणि अपराध हाताळणारा “अष्टवक्र”

जन्म ते मृत्यू हा माणसाच्या आयुष्याचा प्रवास. ह्या प्रवासात कुणी यशस्वी होतो तर कुणी नाही, कुणी चांगला ठरून स्मरणात राहतो तर कुणी अपराधी गुन्हेगार बनून विलप्त होतो. समाज आणि कुटुंब माणसाच्या जडणघडणीत महत्वाची भुमिका बजावत असतात. संस्कार, जडणघडण, गुन्हेगारी, अपराध अशा पैलूंवर लवकरच अष्टवक्र हा सिनेमा उकल करणार आहे. येत्या 8 जून 2018 रोजी सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या संपूर्ण बांधणीला तब्बल 3 वर्षाचे परिश्रम आहे. सिनेमाचं दिग्दर्शन, लेखन, कथा, पटकथा, संवाद अशी ओलराउंडर जबाबदारी प्रदीप साळुंके यांनी पेलली आहे.

आजच्या समाजात विकृत आणि मानसिक संतुलन घालवलेली माणसं आहेत. त्यांना सगळेच अपराधी गुन्हेगार संबोधून मोकळे होतो. पण, जन्मतः सगळेच अपराधी म्हणून जन्मतात का? ह्या गुन्हेगारी विश्वात त्यांना कोण आणतं? अशा अनेक गोष्टींचा उलगडा आपल्याला सिनेमातून बघायला मिळेल. ह्यानिमित्ताने काहीसा दुर्लक्षित राहिलेला विषय अष्टवक्र सिनेमाच्या माध्यमातून हाताळला जाणार आहे. अनेक नवोदित कलाकार सिनेमांतून आपल्याला भेटीस येणार आहेत. अभिनेता विद्याधर जोशी, अभिनेत्री मयुरी मंडलीक, विना अरुण, मंगेश गिरी, प्रीती तोरणे, हर्षदा बामणे ह्यांच्या प्रमुख भुमिका असतील. सिनेमाची निर्मिती वरूनराज प्रोडक्शन निर्माते वरूनराज साळुंके यांची आहे. समाजातील महत्वाच्या विषयावर भाष्य करणारा अष्टवक्र येत्या 8 जून 2018 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे.

Comments

More in News

Like Us on Facebook

Popular Posts

To Top