Connect with us

मराठी कलाकार

स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वेची धमाल.निमित्त ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ कार्यक्रमाचं.

Television

स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वेची धमाल.निमित्त ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ कार्यक्रमाचं.

महाराष्ट्राचे दोन लाडके कलाकार स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे हे कलर्स मराठीवरील अस्सल पाहुणे इरसाल नमुने कार्यक्रमाच्या येणाऱ्या भागात झळकणार आहेत. इथे ते बरीच धम्माल करणार असून काही अनुभव आणि प्रेक्षकांना माहिती नसलेले किस्से देखील सांगणार आहेत. अस्सल पाहुणे इरसाल नमुनेचा हा विशेष भाग येत्या गुरुवार आणि शुक्रवारी रात्री ९.३० वाजता कलर्स मराठीवर बघायला मिळणार आहे.

स्वप्नील जोशीने त्याचा रामानंद सागर यांच्याबरोबचा किस्सा सांगितला आणि कशी त्याची या क्षेत्रामध्ये एन्ट्री झाली हे देखील सांगितले. मुक्ता आणि स्वप्नील यांनी अंकुश चौधरी, सह अभिनेत्री सोनाली कुलकर्णी – सई ताम्हणकर तसेच सतीश राजवाडे यांच्याबद्दल एक आवडती आणि एक खटकणारी गोष्ट देखील सांगितली. आता हे किस्से आणि गोष्टी काय आहेत हे आपल्याला या आठवड्यामध्ये कळणार आहे.

या दोघांसोबतच कलर्स मराठीवरील अस्सल पाहुणे इरसाल नमुने कार्यक्रमामध्ये या आठवड्यामध्ये कलर्स मराठवरील लोकप्रिय मालिका बाळूमामाच्या नावानं चांगभलं मधील कलाकारांनी हजेरी लावली आहे. बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेच्या शूट दरम्यान आलेला एक अद्भुत किस्सा देखील यावेळेस सांगितला. अचानक शूटच्या दरम्यान मेंढ्या गायब झाल्या. खूप शोधल्या तरी त्या मिळाल्या नाही. पण दुसऱ्या दिवशी मात्र त्या सगळ्या मेंढ्या सेटवर परतल्या. या घटनेनंतर कळाले कि, जंगलामध्ये ज्याठिकाणी या मेंढ्या होत्या त्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर असतो. परंतु त्या बाळूमामाच्या मेंढ्या असल्याने त्यांना काहीच झाले नाही आणि त्या सुखरूप परतल्या. त्यावर संतोष अयाचित म्हणाले, ज्या मामांनी आम्हाला मेंढ्या आणि इतर प्राणी पाठवले त्यांना मी फोन केला आणि त्यांना सांगितले कि, आम्ही मेंढ्याची काळजी नाही घेऊ शकलो त्यावर ते म्हणाले, “काही काळजी करू नका. त्या बाळूमामांच्या मेंढ्या आहेत त्यांना हात लावण इतक सोप नाही”. हा खरोखरच एक चमत्कार आहे असं म्हणावं लागेल.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Television

To Top