Connect with us

मराठी कलाकार

वास्तववादी भाष्य करतोय अट्रॉसिटी

Movie Trailers

वास्तववादी भाष्य करतोय अट्रॉसिटी

     

 वास्तववादी सिनेमा समाजाचे डोळे उघडण्याचं काम करतो. अशाच वास्तववादी धर्तीवर बनलेला अट्रॉसिटी हा सिनेमा. सिनेमात केवळ ज्वलंत विषयावरच भाष्य केलंय असं नाही तर आपल्याला मनोरंजनाचा मसालासुद्धा त्यात बघायला मिळणार आहे. सामाजिक बांधिलकीवर भाष्य करणाऱ्या ह्या चित्रपटात एक सुरेख प्रेमकथा पण दाखवली गेली आहे. हा सिनेमा 23 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. सिनेमाची निर्मिती डॉ. राजेंद्र पडोळे यांची आहे. चित्रपटात ऋषभ पडोळे, पूजा जैस्वाल, लेखा राणे, कमलेश सुर्वे, शैलेश धनावडे अशा कलाकारांची जोड आहे.

 देशातील जनतेच्या हिताकरीता सरकार नवनवे कायदे बनवत असतं. पण बरेचशे कायदे ज्या घटकांसाठी बनवले आहेत त्यांनाच ठाऊक नसतात. याचा फायदा मग काही मुठभर लोकं उचलत असतात. अशाच कायद्यांचा दुरुपयोग केला तर काय होऊ शकतं हे अट्रॉसिटी मधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सिनेमाला सुमधुर संगीताची जोडही देण्यात आली आहे. विजय के. पाटील, अखिल जोशी, मंदार चोळकर, अनंत जाधव ह्या गीतकार मंडळींनी गीतं लिहिली असून संगीत अमर-रामलक्ष्मण ह्यांच आहे. सिनेमाची पटकथा आणि संवाद राजन सुर्वे आणि मंगेश केदार यांचे आहेत. नाजूक विषयावर भाष्य करणारा अट्रॉसिटी प्रेक्षकांच्या कितपत पसंतीस येतो हे आपल्याला सिनेमा पडद्यावर आल्यानंतर दिसेलच.

पहा ट्रेलर:-

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Movie Trailers

To Top