Connect with us

मराठी कलाकार

‘गॅटमॅट’-‘आम्ही जुळवून देतो’, अवधूत गुप्तेंच्या आगामी सिनेमाचं पोस्टर लॉन्च.

Upcoming Movies

‘गॅटमॅट’-‘आम्ही जुळवून देतो’, अवधूत गुप्तेंच्या आगामी सिनेमाचं पोस्टर लॉन्च.

असं म्हणतात की लग्नाच्या गाठी ह्या स्वर्गात बांधल्या जातात, पण मग एकमेकांकरिता बनलेल्या ह्या जोडीने लग्नाआधी भेटणे, बोलणे आवश्यक असते. अगदी अशाच काहीश्या कथेवर यशराज इंडस्ट्रीजच्या सहकार्याने अवधूत गुप्तेचे सादरीकरण असलेला आगामी ‘गॅटमॅट’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हल्लीच गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सिनेमाचं टिझर पोस्टर लॉन्च करण्यात आलं होतं. ‘गॅटमॅट’ सिनेमा येत्या १६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असून आता सोशल मीडियावर ‘आम्ही जुळवून देतो’ अशी टॅगलाईन असलेल्या या सिनेमाच्या पोस्टरवर चित्रपटातील प्रमुख कलाकारांची झलक आपणांस पहायला मिळते आहे.

सिनेमाच्या पोस्टरवर अक्षय टंकसाळे, निखिल वैरागर, रसिका सुनील आणि पूर्णिमा डे हे मराठितील युवा कलाकार आपल्याला पहायला मिळतात. या सिनेमात सा-यांची लाडकी अभिनेत्री माझ्या नवऱ्याची बायको फेम शनाया अर्थात रसिका सुनिल झळकणार असून तिच्या भूमिकेबद्दल अधिक माहिती कळू शकलेली नाही. त्यामुळे आता प्रेम जुळवून आणणाऱ्या या आगळ्यावेगळ्या सिनेमाशी ‘गॅटमॅट’ करून घेण्यास प्रेक्षकदेखील उत्सुक असतील हे मात्र निश्चित म्हणावं लागेल.

Comments

More in Upcoming Movies

To Top