Connect with us

मराठी कलाकार

काळजाला स्पर्श करणारा “बाबा”सिनेमाचा टिझर.पहा व्हीडीओ.

Movie Teaser

काळजाला स्पर्श करणारा “बाबा”सिनेमाचा टिझर.पहा व्हीडीओ.

अनेक वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतर अभिनेता संजय दत्त आता मराठी चित्रपटसृष्टीकडे वळला आहे. तो आता मराठी चित्रपटाची निर्मिती करत असून ‘बाबा’ हा त्याचा मराठीतील  पहिली निर्मिती असलेला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. काही दिवसापूर्वी संजयने ट्विटरच्या माध्यमातून त्याच्या या आगामी चित्रपटाची माहिती दिली होती.

‘बाबा’हा चित्रपट संजयने त्याच्या वडीलांना सुनील दत्त यांना समर्पित केला असून या चित्रपटाची निर्मिती संजय एस. दत्त प्रोडक्शन्स आणि ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स अंतर्गत करण्यात येत आहे. प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये वडील आणि मुलामधील नात्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. आपल्या मुकबधीर मुलाला सामान्य मुलांप्रमाणे जीवन जगता यावा यासाठी हे वडील सर्वोतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. त्याला शैक्षणिक शिक्षण देण्यासाठी, लहान लहान गोष्टींमधील आनंद मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करताना दिसतात.

या चित्रपटाच्या टिझरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. हा टिझर सगळ्य़ानाच खूप भावला आहे. टीझरमुळे चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. ‘बाबा’मध्ये ‘तनु वेडस मनू’ आणि ‘हिंदी मिडीयम’ फेम दीपक दोब्रीयाल याची प्रमुख भुमिका आहे. तो या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्यांच्याबरोबर नंदिता पाटकर चित्रपटात दिसणार आहे. त्यांना स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर आणि प्रमुख भूमिकेतील बालकलाकार आर्यन मेंघजी यांची साथ आहे.

Comments

More in Movie Teaser

Like Us on Facebook

Popular Posts

To Top