Connect with us

मराठी कलाकार

तुम्हालाही ऐकून आश्चर्य वाटेल ‘या’ अभिनेत्याने दिलाय बाळासाहेबांचा आवाज.आगामी सिनेमा ‘ठाकरे’

News

तुम्हालाही ऐकून आश्चर्य वाटेल ‘या’ अभिनेत्याने दिलाय बाळासाहेबांचा आवाज.आगामी सिनेमा ‘ठाकरे’

ज्यांच्या भाषणाने श्रोते रोमांचित होऊन जात असं व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. त्यांचे विचार आणि ते विचार पटवण्याची पद्धत लोकांना भावली म्हणूनच बाळासाहेब ठाकरे हिंदूहृदयसम्राट झाले. स्वर्गीय बाळासाहेबांचा जीवनपट असलेल्या ‘ठाकरे’ सिनेमा लवकरच मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाच्या डबिंगचं काम सुरु असून मराठीतील बाळासाहेबांचा आवाज कोणी दिला आहे? हा प्रश्न प्रेक्षकांना नक्कीच पडला आहे.

‘ठाकरे’ सिनेमात मराठीतल्या एका मोठ्या कलाकाराने ठाकरे सिनेमात बाळासाहेबांचा आवाज दिला आहे. नुकतंच त्याचं डबिंग करण्यात आलं. त्या कलाकाराचं नाव आहे… सचिन खेडेकर! हो. अगदी खरं! नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत असलेल्या ‘ठाकरे’ सिनेमात बाळासाहेबांसाठीचा मराठी भाषेतला आवाज अभिनेते सचिन खेडेकर यांनी दिला आहे. आता सचिन खेडेकरांचा आवाज?आणि बाळासाहेबांना? काही जणांना हे कदाचित पटलंही नसेल किंवा मग खेडेकरांनी कदाचित खडा आवाज यावा म्हणून वेगळा सूर लावला असेल अशी काहींची मतं असतील. पण याची काय ते शहानिशा सिनेमा आपल्या भेटीला आल्यावरच होणार आहे. त्यामुळे तोवर तरी आपल्याला वाटच बघावी लागणार आहे.

Comments

More in News

To Top