Connect with us

मराठी कलाकार

अभिनेत्री भाग्यश्रीच्या “ह्या”अदा तुम्हाला वेड लावतील.पहा फोटोज.

Photos

अभिनेत्री भाग्यश्रीच्या “ह्या”अदा तुम्हाला वेड लावतील.पहा फोटोज.

अभिनेत्रींच्या अदा आणि त्यावर फॅन्स फिदा हे नेहमीचं जुळलेलं समीकरणच नाही का? अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर बरीच एक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिच्या या फोटोंमधील अदा कुणालाही अक्षरक्ष: वेड लावतील अशाच असतात. रुपेरी पडद्यावर तिचं फारसं दर्शन झालं नसलं तरी आपल्या या हॉट फोटोंच्या माध्यमातून तिने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतलाय. एका नव्या फोटोशूटमधील भाग्यश्रीचे हे फोटोज तुम्हाला वेड लावल्याशिवाय राहणार नाहीत.

भाग्यश्री लवकरच तेलगू चित्रपट ‘चिकती गदीलो चिताकोटुडू’ या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही आपल्या मादक अदांचा जलवा दाखवणार आहे. याशिवाय लवकरच एका बॉलिवूड चित्रपटामधून भाग्यश्री मोटे लोकांसमोर येणार आहे. ट्रायअँगल प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे हार्दिक गज्जर दिग्दर्शन करणार आहेत. भाग्यश्रीने रुपेरी पडद्यावर ‘पाटील’, ‘माझ्या बायकोचा प्रियकर’, ‘काय रे रास्कला’ अशा विविध चित्रपटात काम केलं आहे.

फोटोंच्या यादीत भाग्यश्रीच्या आणखी एका नव्या फोटोची भर पडली आहे. नव्या फोटोशूटमधील भाग्यश्रीचा हा फोटो कुणालाही क्लीन बोल्ड करेल. जॅकेट परिधान करून हॉट पोज दिलेला भाग्यश्रीचा हा फोटो पाहून सहजच फॅन्स हुरळून जातील यात शंकाच नाही.

Comments

More in Photos

To Top