Connect with us

मराठी कलाकार

पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा दोन भागांत रीलीझ होणार ‘भाई-व्यक्ती की वल्ली’.पहा ट्रेलर.

Movie Trailers

पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा दोन भागांत रीलीझ होणार ‘भाई-व्यक्ती की वल्ली’.पहा ट्रेलर.

महाराष्ट्राचे भूषण असलेले लोकप्रिय लेखक, गीतकार, संगीतकार, कथाकार, नाटककार, गायक दिग्दर्शक आणि अभिनेते असे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजेच सर्वांचे लाडके पु.ल.देशपांडे. महेश मांजरेकर मुव्हीज, फाळकेज् फॅक्टरी- अ फिल्म मॅनेजमेंट कंपनी आणि ग्रेट मराठा एंटरटेन्मेंट कंपनी यांच्यातर्फे पुलंच्या आयुष्यावर आधारित ‘भाई – व्यक्ती की वल्ली’ चित्रपटाची प्रस्तुती केली जात आहे. या चित्रपटाचा ट्रेलर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे प्रमुख मा.श्री. राज ठाकरे, वायाकॉम18 स्टुडीओज चे सीओओ, अजित अंधारे, निखिल साने व्यवसाय प्रमुख, मराठी एंटरटेनमेंट वायाकॉम18, महेश मांजरेकर, सागर देशमुख, इरावती हर्षे, दलिप ताहिल, आणि चित्रपटाची संपूर्ण टीमच्या उपस्थित नुकताच प्रदर्शित झाला.

वैशिष्ट्य म्हणजे मराठीमध्ये पहिल्यांदाच एखादा चित्रपट दोन भागांमध्ये रीलीझ होणार आहे. म्हणजेच, भाई – व्यक्ती की वल्ली या चित्रपटाचा पूर्वार्ध – ४ जानेवारी आणि उत्तरार्ध ८ फेब्रुवारी रोजी सर्वत्र रिलीझ होणार आहे. चित्रपटात भाई अर्थात पु. ल. देशपांडे यांची भूमिका सागर देशमुख तर सुनीताबाईंची भूमिका इरावती हर्षे साकारत आहेत.

“एक नट कायमच वाट बघत असतो अशा एखाद्या भूमिकेची ज्यात त्याला त्याचं वर्चस्व ओतता येईल आणि मला अशा व्यक्तीची भूमिका मिळाली ज्यांना अवघ्या महाराष्ट्राने अक्षरशः डोक्यावर घेतले. इतक्या उदंड प्रेम मिळालेल्या माणसाला साकारायचं कसं हा एक मोठा पोटात गोळा आणणारा प्रश्न माझ्यासमोर होता. त्यांचा आवाका इतका मोठा आहे कि विश्वास बसेना की एक माणूस लिहितो, दिग्दर्शन करतो, सिनेमा बनवतो, पेटी वाजवतो, कथाकथन करतो, टागोर बंगालीतून वाचता यावा म्हणून शांतीनिकेतन मध्ये जाऊन तळ ठोकतो ! केवळ अविश्वसनीय ! आयुष्याच्या अशा टप्प्यावर मला ही भूमिका मिळावी हे मी माझं भाग्य समजतो… त्यांना साकारताना मी स्वत: खूप धमाल केली आहे… मला आशा आहे प्रेक्षकांनाही आमचा सिनेमा आवडेल”. असं आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अभिनेता सागर देशमुख म्हणाला.

Comments

More in Movie Trailers

Like Us on Facebook

Popular Posts

To Top