Connect with us

मराठी कलाकार

भाईंचा ‘विग’आणि तिरुपतीहून मागवले केस!

News

भाईंचा ‘विग’आणि तिरुपतीहून मागवले केस!

भाई व्यक्ती कि वल्ली सिनेमाचा पूर्वार्ध प्रेक्षकांना भावून गेला. येत्या ८ फेब्रुवारीला भाई चित्रपटाचा उत्तरार्ध रिलीज होणार आहे. या चित्रपटातला अभिनेता सागर देशमुखचा ‘साठ्ठोत्तरी’ भाईंचा लूक सध्या खूप वाखाणणला जात आहे. भाईंचा हा लूक हुबेहूब साकारण्यामध्ये सर्वाधिक योगदान आहे ते साळवी ब्रदर्सचे. सुंरेंद्र आणि जितेंद्र साळवी या दोन्ही बंधुंनी हा लूक बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. भाईंचे तरूणपणापासून ते म्हातरपणापर्यंतचे विग ‘नॅचरल हेअर स्टुडियो’ने बनवलेले आहेत.

जानेवारी महिन्यात रिलीज झालेल्या भाई, उरी आणि ठाकरे या मोठ्या सिनेमांसाठी रेंद्र आणि जितेंद्र साळवी यांच्या ‘नॅचरल हेअर स्टुडियो’ने विग डिझाइन केलेले आहेत. भाई सिनेमासारखेच ठाकरे सिनेमासाठी नवाजुद्दिन सिद्दिकीचा लूक डिझाइन करणे खूप चॅलेंजिंग असल्याचे जितेंद्र साळवी सांगतात, ‘नवाजुद्दीनचे कपाळ‘व्ही’ आकाराचे आहे. तर बाळासाहेब ठाकरेंचे कपाळ सरळ आणि मोठे होते. त्यामुळे ‘ठाकरें’चा लूक देताना बॉल्ड कॅप, हेअर पॅसेचा वापर करून नवाजुद्दीन यांना लूक द्यावा लागला आहे.

“भाईंच्या तरूणपणीच्या विगपेक्षा त्यांच्या म्हातरपणाचा विग जास्त कठीण होता. तरूणपणीचा विग ८ दिवसांमध्ये झाला तर म्हातरपणीचा विग व्हायला वीस दिवस लागले. सर्वसाधारणपणे म्हातरपणी केस विरळ होत जातात. आणि केसांची मुळंही दिसू लागतात. त्यात भाईंचे म्हातरपणीचे फोटो तुम्ही पाहिलेत. तर लक्षात येईल की, त्यांचे केस कुरळेही असणे आवश्यक होते. त्यांच्या म्हातरपणीचा लूक डिझाईन करण्यासाठी आम्हांला तिरूपतीवरून केस मागवायला लागले. मग एक-एक केसांचा विग बनवला.”असं ‘नॅचरल हेअर स्टुडियो’चे जितेंद्र साळवी ह्या लूकविषयी सांगतात.

Comments

More in News

To Top