Connect with us

मराठी कलाकार

मोठ्या अवधीनंतर विनोदी सिनेमातून झळकतोय भरत जाधव.‘स्टेपनी’ आगामी सिनेमा.

Actor

मोठ्या अवधीनंतर विनोदी सिनेमातून झळकतोय भरत जाधव.‘स्टेपनी’ आगामी सिनेमा.

बऱ्याच दिवसांनी मराठी चित्रपटसृष्टीतला विनोदाचा बादशहा भरत जाधव चित्रपटातून दिसणार असल्याचं समोर येतंय, आणि तोही एक नवा कोरा विनोदी सिनेमा घेऊन. ‘स्टेपनी’ या चित्रपटातून भरत जाधव पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये हशा पिकवण्यासाठी सज्ज झाले आहेत. भरत जाधव यांनी यापूर्वीही अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून विनोदी भूमिका साकारत प्रेक्षकांना पोट धरून हसवले आहे.

‘स्टेपनी’ या चित्रपटातुन भरत जाधव चित्रपटात विनोदी भूमिका साकारताना दिसणार आहे. या अतरंगी नावावरूनच चित्रपटात नक्कीच वेगळे काहीतरी पाहायला मिळणार हे नक्की आहे. आता ही ‘स्टेपनी’ कोणाची ? या प्रश्नाचं उत्तरं लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे. विनोद म्हटलं की भरत जाधव आणि भरत जाधव म्हटलं की विनोद, असे जणू समीकरणच तयार झाले आहे.

श्री गणराया फिल्म्स आणि अनंत भुवड, नरेंद्र जयस्वाल, भटूलाल जयस्वाल यांनी ‘स्टेपनी’ या चित्रपटची निर्मिती केली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन अजीज नासीर यांनी केले असून छायांकन मुरली कृष्णा यांनी केले आहे. यासोबतच रोहित नागभिडे यांनी या सिनेमाला संगीत दिले असून राजेश एस. एस. यांनी पार्श्वसंगीत दिले आहे. संतोष नाकट यांनी संवादाची तर देवदास भंडारे यांनी कला आणि उदय इनामती यांनी ध्वनीची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटाचे संकलन शशांक शाह यांनी केले असून हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Comments

More in Actor

Like Us on Facebook

Popular Posts

To Top