Connect with us

मराठी कलाकार

भाऊ कदमचा आगामी चित्रपट ‘नशीबवान’. कॉमेडी पाठोपाठ स्वच्छता कामगाराच्या भूमिकेत झळकणार.

Movie Teaser

भाऊ कदमचा आगामी चित्रपट ‘नशीबवान’. कॉमेडी पाठोपाठ स्वच्छता कामगाराच्या भूमिकेत झळकणार.

दैनंदिन जीवनात काही काम चांगल्या पद्धतीने पार पडले की, अमुक व्यक्तीने नशीब काढले असे बोलले जाते, पण जर हेच काम बिघडले तर त्याच्या नशिबाला कोसले जाते. मुळात, आपले नशीब हे आपल्याच हातात असते, आयुष्यात येणाऱ्या चढ उताराला माणूसच जबाबदार असतो, मात्र नाव नशिबाचे पुढे केले जाते. नशिबाच्या याच संकल्पनेवर आधारीत असलेला एक नवाकोरा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अमोल वसंत गोळे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचे नाव ‘नशीबवान’ असे आहे. नुकतेच या चित्रपटाचे सोशल नेट्वर्किंग साईटवर मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

‘नशीबवान’ सिनेमाच्या या मोशन पोस्टरवर मराठीचा गुणी कलाकार भाऊ कदम एक स्वच्छता कामगाराच्या भूमिकेत आपल्याला दिसून येतो. तसेच, त्याच्या हातात त्याचा साथीदार म्हणजे साफ सफाई करणारा झाडूसुद्धा तेवढ्याच दिमाखात चमकत असल्याचे पाहायला मिळते. ‘नशीबवान’ सिनेमातील भाऊ कदमच्या व्यक्तिरेखेचे सर्वत्र कौतुक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या सिनेमात मिताली जगताप वराडकर आणि नेहा जोशी यांची देखील मुख्य भूमिका आहे. नुकत्याच पार पडलेल्या दिवाळी सणाच्या उत्तरार्धात भाऊने याच व्यक्तिरेखेचा पेहराव धारण करत, मुंबईकरांना परिसर स्वच्छ राखण्याचा संदेशदेखील दिला होता. उदय प्रकाश लिखित ‘दिल्ली की दीवार’ या कथेवर आधारीत असलेला ‘नशीबवान’ हा सिनेमा नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच ११ जानेवारी २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Movie Teaser

To Top