Connect with us

मराठी कलाकार

भाऊ कदमच्या विनोदी तडाक्यांनी भरलेला वास्तववादी सिनेमा ‘नशीबवान’.पहा ट्रेलर.

Movie Trailers

भाऊ कदमच्या विनोदी तडाक्यांनी भरलेला वास्तववादी सिनेमा ‘नशीबवान’.पहा ट्रेलर.

एक कुटुंबवत्सल सफाई कर्मचारी सर्वसामान्य आयुष्य जगताना अचानक त्याच्या आयुष्यात असं काहीतरी घडतं आणि त्याचं नशीबच पालटून जातं. अशा अनोख्या धाटणीवर आधारित भाऊ कदम यांच्या ‘नशीबवान’ चा जबरदस्त ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. ‘नशीबवान’चं पोस्टर लाँच झालं तेव्हापासूनच प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती, की ‘कॉमेडीकिंग’ भाऊ कदम यांच्या या चित्रपटात नक्की काय पाहायला मिळणार…? ही प्रतीक्षा अखेर संपली असून’नशीबवान’ चित्रपटात काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार, असं ट्रेलरवरून दिसतंय.

भाऊ कदम यांच्यासोबत चित्रपटात मिताली जगताप वराडकर आणि नेहा जोशी यांसारख्या दमदार अभिनेत्री या चित्रपटात आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण रहदारीच्या ठिकाणी केल्यामुळे हा चित्रपट अतिशय वास्तववादी वाटतोय. शिवाय या चित्रपटात कलाकारांना अतिशय नैसर्गिक रूपात दाखवण्यात आले आहे, त्यांना मेकअपही केलेला नाही. कुठेही दिखाऊपणा, झगमगाट न दाखवता अतिशय सरळ पद्धतीनं या चित्रपटाची मांडणी केलेली दिसत आहे.

लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल वसंत गोळे यांनी केले असून, सिनेमाचे निर्माते अमित नरेश पाटील, विनोद मनोहर गायकवाड आणि महेंद्र गंगाधर पाटील हे आहेत. फ्लाईंग गॉड फिल्म्स आणि गिरी मीडिया फॅक्टरी यांची निर्मिती असलेला हा चित्रपट येत्या ११ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे.

Comments

More in Movie Trailers

To Top