Connect with us

भाऊ कदम स्टारर ‘जगावेगळी अंत्ययात्रा’। अपकमिंग सिनेमा

News

भाऊ कदम स्टारर ‘जगावेगळी अंत्ययात्रा’। अपकमिंग सिनेमा

सातत्याने नवनवे प्रयोग करनारी मराठी सिनेसृष्टी आता आणखी एक नवं पाऊल उचलतेय. हल्लीचे तरुण चांगले शिकतात सवरतात मोठे होतात. चांगल्या दर्जाचं शिक्षण घेऊनही त्यांना नौकऱ्या मिळत नाहीत. हाच विषय आता मराठी सिनेमाने उचलला आहे. भाऊ कदम स्टारर आगामी ‘जगावेगळी अंत्ययात्रा’ हा याच धाटनीवर बनलेला सिनेमा आहे. गंभीर मुद्दा कॉमेडीचा टच देऊन हाताळण्याचा प्रयत्न सिनेमातून होतो आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनासमवेत ह्या नाजूक मुद्याला हात घालण्याचं धाडस दिग्दर्शक अमोल लहांडे ह्यांनी केलं आहे. एका नव्या ताज्या आणि फ्रेश विषयासोबतचं चांगल्या संगीताचा डोस पण सिनेमाला आहे. सिनेमातील गाणी महालक्ष्मी अय्यर, सिद्धार्थ महादेवन, वैशाली सामंत, रोहन प्रधान, सुरेश वाडकर ह्यांनी गायली आहेत.

‘अल्टिमेट फिल्म मेकर्स अँड प्रा. लि.’ च्या बॅनरखाली डॉ. नितीन तोष्णीवाल हे सिनेमाची निर्मिती करीत आहेत. भाऊ कदम, राजन भिसे, माधव अभ्यंकर, सुहास परांजपे यांसारखी स्टारकास्ट ह्या ‘जगावेगळी अंत्ययात्रा’ ची आहे. अनेक नवे चेहरे सुद्धा आपल्याला ह्या सिनेमातून दिसतील. सिनेमा 23 मार्चला सर्वत्र प्रदर्शित होत असल्याचं सध्या कळतंय.

Comments

comments

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

More in News

Like Us on Facebook

Advertisement

Popular Posts

To Top