Connect with us

मराठी कलाकार

सोशल मीडियावर व्हायरल झालेला भावड्या येतोय ३ ऑगस्टला सर्वांच्या समोर!

Upcoming Movies

सोशल मीडियावर व्हायरल झालेला भावड्या येतोय ३ ऑगस्टला सर्वांच्या समोर!

सर्वत्र चर्चेचा विषय बनलेल्या, सोशल मीडियावर नव्यानवा पोस्ट शेअर करून धुमाकूळ घालणारा भावड्या नेमका कोण आहे? हे जाणून घ्यायला सर्वचजण उत्सुक आहेत. आता तोच भावड्या उद्या म्हणजे ३ ऑगस्टला सर्वांसमोर येत आहे. सध्या भावड्या विषयी टीझर पोस्ट व्हायरल होत आहेत. प्रत्येकजण त्याच्या आगमन साठी उत्साहित आहेत पण तो नेमका आहे तरी कोण त्याबद्दल गोंधळ आहे.


सुरुवातीस अंदाज घेता असे वाटले की ‘पुष्पक विमान’ चित्रपट 3 ऑगस्टला रिलीज होत असल्याने त्याचा प्रोमोशन फंडा वगैरे असू शकतो. पण पुढे भावड्यानेच पुष्पक विमान टीमला त्यांच्या प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मग अपकमिंग ‘पार्टी’ सिनेमाच्या टीमने भावड्याबद्दल पोस्ट करणे चालू केले. हा भावड्या इथवरच थांबला नाही तर त्याने अनेक मराठी सिनेमा निर्माते, सेलिब्रिटीजना पोस्ट टॅग करणे चालू केले. रवी जाधव यांना पोस्ट टॅग करून टाईमपास सिनेमातील डायलॉग ऐकवला तर, रितेश देशमुखला त्याच्याच ‘लय भारी’ सिनेमातील डायलॉग टॅग केला. थोडक्यात काय तर सध्या भावड्याची सर्वत्रच चलती आहे. आणि नेमका हा भावड्या कोण हे आपल्याला उद्याच कळेल.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Upcoming Movies

To Top