Featured
“ह्या”ऐतिहासिक वेबसिरीजमध्ये झळकणार भूषण प्रधान आणि पल्लवी पाटील.
‘शेंटीमेंटल’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘बॉइज-2’, ‘तू तिथे असावे’ अशा सिनेमांतून दिसलेली ग्लॅमरस अभिनेत्री पल्लवी पाटील आता वेबसीरिजच्या दुनियेत पदार्पण करतेय. पल्लवी लवकरच ‘गोंद्या आला रे’ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता भूषण प्रधाननेसुध्दा इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात त्याचे टक्कल करत असल्याचे पहायला मिळते होते. या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले आहे. भूषण लवकरच झी ५ अॅपच्या गोंद्या आला रे वेबसिरीजमध्ये झळकणार आहे. यात तो दमोदर हरी चापेकरांची भूमिका साकारणार असल्याचा खुलासा त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे. 15 ऑगस्टला ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
View this post on Instagramमी… दामोदर हरी चापेकर! #GondyaAlaRe (Web Series) Premieres 15th Aug, on #ZEE5Premium. PC: @krn_patil
A post shared by B H U S H A N P R A D H A N (@bhushan_pradhan) on
जुलमी डब्ल्यू. सी. रॅण्ड या अधिकाऱ्याची चापेकर बंधूंनी हत्या केली होती. या घटनेवर ‘गोंद्या आला रे’ ही वेब सिरीज आधारलेली आहे. पल्लवी पाटील या मालिकेत दामोदर चापेकरांची पत्नी ‘दुर्गाबाई चापेकर’ या शूर महिलेची भूमिका साकारणार आहे. नुकताच पल्लवीने विधवा झाल्यावर केशवपन करून लाल साडीचा पदर डोक्यावर घेतलेला दुर्गाबाईंचा एक ब्लॅक एन्ड व्हाइट फोटो आणि स्वत:चा तशाच लूकमधला फोटो शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी पल्लवीने आपला अंधारात उभी असलेला नऊवारी साडीतला लूक सोशल मीडियावर टाकला होता.
“सिनेजगतात काम केल्यावर वेबसीरिजच्या दुनियेतही काम करायची इच्छा होतीच आणि अंकुर काकतकरने मला दुर्गाबाईंची भूमिका ऑफर केली. ह्या भूमिकेचा अभ्यास करताना त्यांच्या सशक्त व्यक्तिमत्वाची जाणिव होत गेली. मला आनंद वाटतोय, की एका सशक्त भूमिकेने माझा वेबसीरिजच्या जगात डेब्यू होतोय.”–पल्लवी पाटील, अभिनेत्री
View this post on InstagramA post shared by B H U S H A N P R A D H A N (@bhushan_pradhan) on
