Connect with us

मराठी कलाकार

किर्तनकाराच्या वेशातील महेश मांजरेकर वाढवतायंत बिगबॉस मराठीची उत्सुकता!

बिग बॉस मराठी

किर्तनकाराच्या वेशातील महेश मांजरेकर वाढवतायंत बिगबॉस मराठीची उत्सुकता!

टेलिव्हिजन विश्वातील वादग्रस्त कार्यक्रम बिगबॉस मराठीच्या पहिल्या यशस्वी पर्वानंतर, कलर्स मराठी आता बिग बॉस मराठीचा दुसरा पर्व घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या पर्वाची घोषणा झाल्यापासून प्रत्येक प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. गेल्या पर्वाप्रमाणेच यंदाच्या पर्वाचं सूत्रसंचालनदेखील महेश मांजरेकर करणार आहे. नुकताच या पर्वाचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या प्रोमोनंतर त्याचा आणखी एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात ते एका आगळ्यावेगळ्या रुपात पाहायला मिळणार आहेत.

बिग बॉस मराठीच्या प्रोमोजमधून महेश मांजरेकर वेगवेगळ्या अंदाजमध्ये प्रेक्षकांसमोर आले. पहिल्या पर्वामध्ये सूत्रसंचालनाच्या अनोख्या स्टाईलने ज्यांनी प्रेक्षक आणि सदस्य सगळ्यांचीच मने जिंकली असे आपल्या सगळ्यांचे आवडते महेश मांजरेकर बिग बॉस मराठी सीझन 2 चे सूत्रसंचालन करणार आहेत. जनजागृती, लोकशिक्षण, पुराण कथेतून संस्कृती दर्शन आणि थोर परंपरेची जाणीव करून देणारा अतिशय सशक्त लोककलेचा प्रकार म्हणजे कीर्तन. आणि कीर्तनकार हा मुळातच पुराण इतिहासातील आदर्श दाखले देऊन आजच्या समाजाला कस वागावं, कस जगावं, हे कानपिचक्या देऊन शिकवतो. हे सांगण्याचा उद्देश असा कि, बिग बॉस मराठीच्या नवीन प्रोमोमध्ये महेश मांजरेकर कीर्तनकाराच्या रुपात दिसणार आहेत.

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या प्रोमोमध्ये महेश मांजरेकर एका राजकीय नेत्याच्या वेशभूषेत पाहायला मिळाले होते. त्यांच्या या लूकला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसादही मिळाला होता. सध्या तरी बिगबॉस मराठीच्या घरामध्ये या वेळेस कोणते ख्यातनाम व्यक्ती जातील याविषयाचे तर्क बांधण्यास रसिकांची सुरुवात झाली आहे.

Comments

More in बिग बॉस मराठी

To Top