Connect with us

मराठी कलाकार

लोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”!संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.

बिग बॉस मराठी

लोणावळा नाही तर फिल्मसिटीत शूट होणार “बिग बॉस मराठी”!संभाव्य स्पर्धक असतील “हि”मंडळी.

बिग बॉस या कार्यक्रमाच्या आजवरच्या सगळ्याच सिझनला प्रेक्षकांचे खूपच चांगले प्रेम मिळाले आहे. वाद, विरोध, प्रेम, मैत्री अशा वेगवेगळ्या अंगाने रंगलेल्या ‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय शोच्या पहिल्या पर्वाने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले होते. या कार्यक्रमाच्या फॅन्ससाठी एक खूपच चांगली बातमी आहे. या कार्यक्रमाचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून बिग बॉसची टीम जोरदार कामाला लागली आहे.

‘बिग बॉस मराठी’ च्या पहिल्या सिझनचे विजेतेपद मेधा धाडेने पटकावले होते. पहिल्या सिझनचे चित्रीकरण लोणावळ्यात झाले होते. पण यंदाच्या सिझनमध्ये काही बदल करण्यात येणार आहेत. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार या कार्यक्रमाचे चित्रीकरण हे मुंबई फिल्मसिटी मध्ये होणार आहे. लवकरच या कार्यक्रमाचा सेट तिथे उभारण्यात येणार आहे. मुंबईत चित्रीकरण करणे हे सोयीस्कर असल्याने बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या टीमने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. तसेच या कार्यक्रमात कोणकोणते स्पर्धक असणार याबाबत देखील त्यांनी वृत्त दिले आहे.

शैलेश दातार, अक्षया गुरव, वीणा जगताप, अर्चना निपाणकर, गौतम जोगळेकर हे कलाकार बिग बॉसच्या घरात दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. माझ्या नवऱ्याची बायको फेम रसिका सुनीलला देखील बिग बॉस मराठी या कार्यक्रमासाठी विचारण्यात आले होते. रसिकानेच याबाबत नुकताच खुलासा केला होता.

Comments

More in बिग बॉस मराठी

To Top