Connect with us

मराठी कलाकार

ओळखा बघू “हि”बिगबॉस मराठी-२ च्या स्पर्धकांची नावं…

बिग बॉस मराठी

ओळखा बघू “हि”बिगबॉस मराठी-२ च्या स्पर्धकांची नावं…

वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय रिएलिटी शो म्हणजेच ‘बिग बॉस’. बिग बॉसमराठीच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता लवकरच ‘बिग बॉस मराठी २’ सुरू होणार आहे. दाच्या पर्वात कोणकोणते कलाकार सहभागी होणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. नुकतच कलर्स मराठीच्या ऑफिशीएल इन्स्टाग्रामवर बिग बॉस २ च्या दुसऱ्या पर्वातील स्पर्धकांची नावं रिव्हील केली आहेत. रविवारी त्यांनी एक इन्स्टा पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये लिहीलं होतं की १ एप्रिलला बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाची नावं जाहीर होणार. त्याचप्रमाणे आज एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

इन्स्टावरील या पोस्टमध्ये स्पर्धकांचे चेहरे दिसत नाहीयेत. पण त्या स्पर्धकांच्या नावाचे पहिले अक्षर देण्यात आलं आहे. या पहिल्या अक्षरावरून या दुसऱ्या पर्वात कोण कोण कलाकार असणार हे तुम्हाला कळणार आहे. या पोस्टवरून बिग बॉस फॅन्सनी कोण कोण कलाकार यात असणार या विषयी तर्क वितर्क लावायला सुरूवात केली आहे. अभिनेता चिन्मय उद्गीरकर, अभिनय बेर्डे, अमृता पवार, वैभव मांगले, अधोक्षज कऱ्हाडे, अर्या अमंबेकर, असावरी जोशी असे अनेक पर्याय प्रेक्षकांनी सुचवले आहेत.

अभिनेता शैलेश दातार, अक्षया गुरव, वीणा जगताप, अर्चना निपणकर, गौतम जोगळेकर यांच्या नावांसोबतच गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर हिच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. त्याचप्रमाणे रसिका सुनील, सुप्रिया पाठक यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. दुसरं पर्व कधीपासून सुरू होणार आणि त्याचं सूत्रसंचालन कोण करणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. पण बघायला गेलं तर एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवशी एप्रिल फुल करण्याची सगळ्यांनाच हुक्की येते. कलर्स मराठीने बिग बॉस मराठी २ च्या स्पर्धकांची नावं जाहीर केल्यामुळे ही नावं खरी की एप्रिल फुल, हे काही कालावधीतच कळेल.

Comments

More in बिग बॉस मराठी

Like Us on Facebook

Popular Posts

To Top