Connect with us

मराठी कलाकार

तर”हा”असणार बिगबॉस मराठीचा दुसरा सहभागी स्पर्धक!

बिग बॉस मराठी

तर”हा”असणार बिगबॉस मराठीचा दुसरा सहभागी स्पर्धक!

ह्या आठवड्यात बिगबॉस मराठी२ चा पहिला प्रोमो प्रदर्शित करण्यात आला होता. ह्या प्रोमोने रसिकांची ह्या शोच्या सिझन २ बद्दलची उत्सुकता वाढवलेली असतांना त्यात आता आणखी भर पडल्याचं चित्र आहे. कारण आता बिगबॉस मराठी२ चा दुसऱ्या प्रोमोचे फोटोज समोर आले असून हा प्रोमोसुद्धा अगदी भन्नाट अंदाजातला आहे याचा अंदाज लावता येऊ शकतो. दुसऱ्या प्रमोचा महेश मांजरेकर यांचा लूक समोर आला आहे. पहिल्या प्रमोत नेता असणारे मांजरेकरांनी तमाशाचा फड गाठला आहे.

पहिल्या पर्मोनंतर बरीच लट सुलट चर्चा सुरू झाली आहे. ‘मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न बघणारे हे कवी मनाचे नेते होणार का बिग बॉसचे विजेते’ हे वक्तव्य करणारे महेश मांजरेकर नेमके कोणत्या नेत्याविषयी बोलत आहेत असे तर्कवितर्क लावायला सुरूवात झाली आहे. साधारण केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याशी मिळता जुळता हा प्रोमो आहे. कवितेच्या रूपात बोलण्ययाची त्यांची सवय या प्रमोत वापरण्यात आली आहे. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये रामदास आठवले दिसणार का? अशी चर्चा सुरू झाली होती.

बिगबॉस मराठी २ च्या दुसऱ्या सीझनचं सुत्रसंचालनसुद्धा महेश मांजरेकर करणार असून याआधीच बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा पहिला प्रमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. एखादा नेता या सीझनमध्ये बघायला मिळण्याची शक्यता असल्याचं हा प्रमो बघितल्यावर कळतं. लवकरच बिग बॉस मराठीचा अजून एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे आणि या प्रोमोमध्ये महेश मांजरेकरांचा अस्सल मराठमोळा अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ज्यामध्ये त्यांचा फेटा, कुर्ता असा लुक दिसणार आहे. प्रोमो एका चित्रपटामधील क्लिप सारखा दिसत आहे ज्यामध्ये सुंदर लावणी सादर होताना दिसत आहे… हे वाचल्यावर, कोणी या कलेशी संबधीत व्यक्ती तर बिग बॉस मराठीच्या घरात जाणार नाही ना ? हा प्रश्न प्रेक्षकांना पडू शकतो.

Comments

More in बिग बॉस मराठी

To Top