Connect with us

मराठी कलाकार

बिगबॉस मराठीच्या रॅपर प्रोमोमागे “हा”आहे खरा आवाज!

बिग बॉस मराठी

बिगबॉस मराठीच्या रॅपर प्रोमोमागे “हा”आहे खरा आवाज!

‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात कोणते कलाकार असणार याची चर्चा रंगत असतानाच या पर्वाचं सूत्रसंचालन करणारे अभिनेते महेश मांजरेकर यांचा ‘रॅपचीक रॅपर लूक’ आता चर्चेचा आला आहे. मांजरेकरांनी या रिएलिटी शोसाठी रॅप साँगही शूट केलंय जे त्यांनी स्वतः गायलं आहे. बिग बॉसने ठेवलेल्या स्पर्धकांच्या नावाची कोडी सोडवताना प्रेक्षकांच्या डोक्याला झिणझिण्या आल्या आहेत. त्यातच एक बिग बॉसच रॅपचिक साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. बिग बॉस मराठीचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांच्या रॅपचिक लूकचीच चर्चा सध्या रंगली आहे.

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या भागाच्या प्रोमोसाठी महेश मांजरेकरांनी चार वेगवेगळ्या लूकमध्ये शूटींग केलं आहे. प्रत्येक प्रोमोमध्ये त्यांचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळाला आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या चौथ्या प्रोमोमध्ये महेश मांजरेकरांची डॅपर लूक आणि विंटेज बीटल रेट्रो गाडीवर बसून या रॅप साँगमधली एण्ट्री एकदम कडक आहे. हे रॅप साँग सचिन पाठक (यो) याने लिहीलं आहे. या आधी सचिनने ‘गॅटमॅट’,’लकी’ सारख्या अनेक मराठी चित्रपटांसाठी गाणी लिहीली आहेत. तर हिंदी चित्रपटसृष्टीसाठी देखील सचिनने गीत लेखन केले आहे. त्याने लिहीलेलं सिंघम रिटर्नमधील ‘आता माझी सटकली’ हे गाणं विशेष गाजलं होतं.

थोडक्यात काय तर महेश मांजरेकर यांच्या रॅपचिक लूकचीच चर्चा सध्या रंगली आहे. महेश मांजरेकरांनी अतिशय धम्माल करत हे रॅपचिक साँग शूट केले आहे. या गाण्याच्या चित्रिकरणासाठी सहा वेगळ्या प्रकारचे सेट तयार करण्यात आले आहेत. महेश मांजरेकर या गाण्यामध्ये चार वेगवेगळ्या डॅपर लुक्समध्ये दिसत आहेत.

Comments

More in बिग बॉस मराठी

To Top