Connect with us

मराठी कलाकार

बिगबॉस मराठी२।प्रेक्षकांसाठी असेल “हे”सरप्राईझ. तर असं असेल बिगबॉसचं घर.

बिग बॉस मराठी

बिगबॉस मराठी२।प्रेक्षकांसाठी असेल “हे”सरप्राईझ. तर असं असेल बिगबॉसचं घर.

मराठी टेलिव्हीजनवरचा सगळ्यात उत्कंठावर्धक रिअॅलिटी शो म्हणजेच बिग बॉस मराठी – सिझन २ लवकरच विविध क्षेत्रातील १५ कलाकार घेऊन बिग बॉस मराठी सिझन २ मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करायला तयार आहे. बिग बॉसच्या घरातील सदस्य आणि प्रेक्षक यांच्यामधील दुवा म्हणून कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर करणार आहे. बिग बॉस मराठी सिझन २ दिमाखदार सोहळ्याद्वारे २६ मे रोजी संध्या. ७.०० वा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून त्याचे भाग सोम ते रवि रात्री ९.३० वा. कलर्स मराठी वाहिनीवर बघता येणार आहे.

एक असं घर ज्याने तमाम प्रेक्षकांची मने जिंकून त्यांना आपलसं केलं, एक असं घर ज्याने भांडण-वाद विवाद बघितले, असं घर ज्याने मैत्री कशी निभवावी हे शिकवलं, ज्याने सदस्यांचे रडण–हसण पाहिलं, ज्या घराने सदस्यांचे मुखवटे काही दिवसांतच उतरवले आणि त्यांचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर आणला, असं घर जे महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलं… आता ते घर परत येत आहे नवे आणि अतरंगी सदस्य घेऊन तुमचं मनोरंजन करायला, तुमची मने पुन्हा जिंकायला…

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये प्रेक्षकांसाठी एक मोठं सरप्राईझ असणार आहे ते म्हणजे बिग बॉसचे घर जे तब्बल १४,००० चौरस फूट अशा भव्य जागेमध्ये तयार करण्यात आले आहे. या घराला आलिशान अस्सलं मराठमोळ्या वाड्याचे स्वरूप देण्यात आले आहे, ज्याच्या मध्यभागी मोठे आंगण आणि मोठे ऍक्टिव्हिटी क्षेत्र असणार आहे. याव्यतिरिक्त, एक भव्य सेट तयार करण्यात आला आहे ज्याद्वारे महेश मांजरेकर स्पर्धकांशी संवाद साधतील. हे १५ कलाकार त्यांच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच १०० दिवस एका अनोळखी जागी ७५ कॅमेरांच्या नजरकैदेत रहाणार असून त्यांचा हा प्रवास कसा असेल हे लवकरच पाहता येणार आहे.

 

 

Comments

More in बिग बॉस मराठी

Like Us on Facebook

Popular Posts

To Top