Connect with us

आता लवकरच बिग बॉस येणार मराठीत । सलमान खानने केली घोषणा

bigg-boss-marathi-tv-show-2018

Television

आता लवकरच बिग बॉस येणार मराठीत । सलमान खानने केली घोषणा

bigg-boss-marathi-tv-show-2018

‘बिग बॉस’ च्या मराठी चाहत्यांसाठी एक खुश खबर आहे आणि ती म्हणजे हिंदीतला प्रसिद्ध रिऍलिटी टीव्ही शो “बिग बॉस” मध्ये शिल्पा शिंदे हिला अकराव्या पर्वाची विजेती घोषित केल्यावर सूत्रसंचालक सलमान खान याने चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. ती म्हणजे लवकरच “‘बिग बॉस” हा शो मराठीत येत आहे. तसेच हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीत आपले स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केलेला मराठी अभिनेता ‘रितेश देशमुख’ मराठीमध्ये या शोचे सूत्रसंचालन करणार आहे. रितेशनं याआधी ‘विकता का उत्तर’ या टीव्ही शोचं सूत्रसंचालनही केलं होतं. मात्र हि बातमी ऐकल्यावर स्वतः शिल्पा शिंदे हिने सुद्धा “मला सुद्धा बिग बॉस मराठीत होस्ट करायला आवडेल”, अशी प्रतिक्रया दिली आहे.

Ritesh Deshmukh Bigg Boss Marathi

Shilpa-Shinde-Hina-Khan-Bigg-Boss-11

शोची प्रसिद्धी आणि मराठी प्रेक्षकांचा विचार करता ‘एन्डमॉल शाइन इंडिया’च्या निर्मात्यांनी बिग बॉस हा शो मराठीतही आणण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही महिन्यांमध्येच शोला सुरुवात होणार असल्याची माहिती एन्डमॉल शाइन इंडियाच्या सुत्रांनी दिली आहे. बिग बॉस मराठीच्या पहिल्या हंगामासाठी सूत्रांनी पुष्टी केली की मराठी भाषेची लोकप्रियता आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये आश्चर्यकारक प्रतिसाद यामुळे चॅनेल आणि प्रॉडक्शन हाउस लवकरच नवीन सीझनची सुरूवात करेल.

लोणावळा येथे सेट (घर) जवळजवळ तयार आहे हे लक्षात घेता आणि कलर्स टीव्हीवर ही घोषणा करण्यात आली आहे, त्यामुळे कलर्स मराठी यावाहिनीवर हा शो सुरू होण्याची शक्यता आहे आणि एक महिना किंवा दोन महिन्यांत कोणत्याही वेळी बिग बॉस मराठी शो सुरू होऊ शकतो. कलर्स मराठी वाहिनीवर येत्या एक दोन महिन्यांमध्ये बिग बॉस मराठी पाहवयास मिळेल.

बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात कोणते सेलिब्रिटी स्पर्धक दिसणार हे पाहणे नक्कीच औत्सुक्याचे राहिल.मराठी कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी मराठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. त्यामुळं या कलाकारांना बिग बॉसच्या घरात पहाणं प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल. ‘बिग बॉस’ आणि सेलिब्रिटींमधील वाद हे समीकरण असल्यानं मराठी बिग बॉसमध्येही टोकाचे वाद रंगणार का? की आणखी काही वेगळं पाहायला मिळतयं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Comments

comments

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

More in Television

Like Us on Facebook

Advertisement

Popular Posts

To Top