Connect with us

मराठी कलाकार

स्मिताला वाचवण्यासाठी आस्तादने केलं टक्कल! राजेश सिक्रेट रूम मध्ये?

Day-22-Bigg-Boss-Marathi-01

Television

स्मिताला वाचवण्यासाठी आस्तादने केलं टक्कल! राजेश सिक्रेट रूम मध्ये?

विनीत भोंडे आणि आरती सोळंकी बिगबॉसच्या घरातून बाहेर पडल्यापासून बिगबॉसचा कॉमेडी एन्टरटेनमेन्ट फॅक्टर थोडासा कमी झालेला बघायला मिळतोय. घरात सध्या दोन ग्रुप पडलेले आहेत पहिला रेशम, राजेश आणि आस्तादचा तर दुसरा सई आणि मेघाचा ह्यातील दुसऱ्या ग्रुपला चाहत्यांकडून सध्या भरपूर सपोर्ट बघायला मिळत आहे. घरातला दिवस २२, स्मिता गोंदकर घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेली होती. बिगबॉसचा फोन स्मिता हिला आला आणि त्यात तिला मिळालं ते एक विचित्र असं टास्क! स्मिताला जर बाहेर पडण्यापासून वाचायचं असेल तर तिला स्वतःच्या हातांनी आस्तादचं मुंडन करावं लागणार होतं.


घरातील सर्व सदस्य एकत्र जमले, आणि स्मिताने सर्वांना तिला मिळालेलं टास्क सांगितलं. ह्यावेळी सर्वांचे चेहरे पाहण्यालायक झाले होते. मात्र आस्ताद ह्याला लगेचंच तयार झाला. तो स्मिता समोर जाऊन बसला आणि स्मिताने स्वतःच्या हाताने आस्तादचं टक्कल केलं. आता ह्यामुळे तरी स्मिता घरातून बाहेर जाण्यापासून वाचली आहे. तसंही ऊन्हामुळे हैराण झालेल्या हया सदस्यांपैकी आस्तादला टक्कल केल्यामुळे हलकं आणि थंड थंड कुल कुल चा फिल नक्की येईल.


दुसरीकडे रेशम आणि राजेश यांच्यापैकी कोण बाहेर जाणार हे आजच्या एपिसोड मध्ये दाखवले जाईल. पण सध्यातरी असं दिसतंय कि रेशम सेफ झाली आहे आणि राजेश हा एकतर बिगबॉसमराठी मधून बाहेर झाला आहे किंवा सिक्रेट रूम मध्ये आहे.

वाईल्ड कार्ड द्वारे स्पेशल एंट्री?

बिगबॉसच्या खेळातील हा नियमच आहे कि खेळ पुढे गेल्यानंतर ह्यात वाईल्ड कार्डद्वारे एका स्पर्धकाची स्पेशल एंट्री घरात होते. आणि हा सदस्य इतरांसोबत पुढील खेळासाठी पात्र ठरतो. आता मराठी बिगबॉसमध्ये सुद्धा हि वाईल्ड कार्ड एंट्री होणार का? हाच प्रश्न चाहत्यांच्या समोर आहे. आणि हि एंट्री होणार असेल तर ह्यासाठी देवदत्त नागे, शिव ठाकरे, प्रथमेश परब ह्यांची नावं चर्चेत आहेत.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Television

To Top