Connect with us

मराठी कलाकार

मेघाला वाचवायला सईने केलं फॅमिली फोटो आणि आवडत्या वस्तूंचं बलिदान

Television

मेघाला वाचवायला सईने केलं फॅमिली फोटो आणि आवडत्या वस्तूंचं बलिदान

बिगबॉसच्या घरातील दिवस २३ वा. सर्व कार्य नित्यनेमाप्रमाणे चाललेली. ह्या घरात आजवर खुप वादविवाद, भांडणं झाली. बिगबॉसने दिलेले टास्क आणि त्यादरम्यान होणारे वाद काही नवीन नाही. पण हे सर्व करतांना देखील घरातील सदस्य कुणी जर डेंजरझोन मध्ये असेल किंवा घराबाहेर पडण्यासाठी नॉमिनेट झाला असेल तर त्याला साथ द्यायला पुढे धावतात. नुकतंच दोन दिवसांपुर्वी स्मिताला असाच विचित्र टास्क मिळाला होता. तिला जर घराबाहेर जाण्यापासून वाचायचं असेल तर आस्तादला स्वतःच टक्कल करून घ्यावं लागणार होतं. आणि विशेष म्हणजे स्मिताला स्वतःच्या हाताने आस्तादचं टक्कल करावं लागणार होतं.

कालही अगदी असंच काहीसं घडलं. घरातील सदस्य मेघाला वाचवण्यासाठी सई लोकूर हिला तिच्या आवडत्या वस्तूंचं, फॅमिली फोटोचं बलिदान द्यावं लागणार होतं. ह्या वस्तू तिला तिच्या हाताने फाडाव्या लागणार होत्या. ह्यावेळी सर्व सदस्य समोर जमले होते सईने तिच्या आवडत्या टेडीला एक मिठी मारली आणि बिगबॉस मी ह्याला फाडतेय असं म्हणून कात्रीने पूर्ण तो टेडी फाडून टाकला, आणि फोटोज सुद्धा फाडले. ह्यावेळी सईला डोळ्यात अश्रू अनावर होत नव्हते. इतर सर्वजण उदासतेने हे सर्व बघत होते. सई आणि मेघाची मैत्री आपल्याला सर्वांना बिगबॉसच्या निमित्ताने पाहायला मिळतचं आहे. आणि त्याच मैत्रीपायी सईने मेघासाठी दिलेलं हे खुप मोठं योगदान आहे असंच म्हणता येईल.

रात्री सर्व सदस्य एकत्र बसल्यानंतर बिगबॉसने काही सूचना दिल्या. त्यानुसार ह्या आठवड्यात काही सदस्यांनी अतिशय उत्कृष्टपणे काम केलेलं आहे. आणि त्यासाठी बिगबॉस त्यांना खास भेटवस्तू देणार आहे. नवीन आठवडा नवीन चॅलेंजेस सोबत आता बिगबॉस कुणावर प्रसन्न होतात हे आपल्याला दिसेलचं. विशेष म्हणजे अलार्म वाजल्यावर स्टोअररुम चा दरवाजा उघडून ह्या भेटवस्तू आस्ताद ला सदस्यांना द्याव्या लागणार आहेत.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Television

To Top