Connect with us

मराठी कलाकार

रेशमने केलं मेघाला हैराण । खेळ मांडला टास्क

Television

रेशमने केलं मेघाला हैराण । खेळ मांडला टास्क

मराठी बिगबॉसचा दिवस २४ वा. नेहमी जसा काही ना काही टास्क सदस्यांना मिळतो तसाच आज पण मिळाला. पण आजचं टास्क जरासा इंटरेस्टिंग आहे. सुरुवातीस घरातील माहोल थोडा शांत राहिला. मग पुढे सर्व सदस्य एकत्र बसले. आजचा बिगबॉसनी दिलेला टास्क पुष्करने वाचून दाखवला. आपण सगळ्यांनी जे अनुभवलं ते बालपण, त्यातील खोडकरपणा, खट्याळपणा, गोडवा आणि निरागसता ह्या एपिसोडमध्ये बघायला मिळाला. जसं आपण खेळण्याला वागवलं तसंच आयुष्यात आपल्यालाही कुणीतरी खेळणं म्हणून वापरलं आणि आता हाच खेळ आजच्या टास्कमध्ये घरातील सदस्यांना खेळावा लागणार होता.

खेळाचे नियम काहीसे असे होते कि घरातील सदस्य दोन ग्रुप मध्ये विभागले जातील. त्यातील एक ग्रुप लहान मुलाची ऍक्टिंग करेल तर दुसरा खेळण्याची. एकाला बालकाप्रमाणे वागायचं होतं तर दुसऱ्याला न थकता दिवसभर त्याचं खेळणं व्हायचं होतं. भूषण, मेघा, आस्ताद, स्मिता, जुई, अनिल थत्ते हि मंडळी खेळणं बनली होती तर पुष्कर, रेशम, सई, सुशांत आणि उषा नाडकर्णी हि मंडळी लहानग्यांची ऍक्टिंग करत होते. ह्या लहान बाळांनी त्यांच्या खेळण्यांना चांगलंच सतवलं. रेशमने तिचं खेळणं असलेल्या मेघाला अक्षरशः हैराण करून सोडलं. तिने बाहुली बनलेल्या मेघाच्या अंगावर मोठी शाल टाकून ठेवली. आत जीव गुदमरत असल्याने मेघानेसुद्धा नामी शक्कल लढवून बऱ्याचदा ती काढली सुद्धा. पुढे तिला टाचा उचलून नाचत राहायला लावलं. इतर सदस्यांनी सुद्धा अशीच काहीशी त्यांच्या खेळण्याची मजा घेतली. सईने जुईकडून खूप सारा वॉक करून घेतला. पुष्करने स्मिताला तिचा हात खांबावर मारायला सांगितला, भूषण आणि आस्तादकडून सुद्धा बऱ्याच कृती ह्यावेळी सदस्यांनी करून घेतल्या.

थोडक्यात काय तर चिल्लरपार्टीच्या नखर्यानी खेळण्यांना बेहाल करून सोडलं आणि त्यांच्या नाकी नऊ कालच्या दिवशी आणले होते.

Comments

More in Television

To Top