Connect with us

मराठी कलाकार

पुष्कर आणि आस्तादमध्ये बाचाबाची। कालच्या खेळण्यांनी आज घेतला बदला

Television

पुष्कर आणि आस्तादमध्ये बाचाबाची। कालच्या खेळण्यांनी आज घेतला बदला

मराठी बिगबॉस दिवस २५. आजचा घरातील दिवस नुसता बदला घेण्यासाठीचा दिवस आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हो कारण कालचं टास्क हे संपलं नसून ते आजही कंटिन्यू असणार आहे बदलणार आहेत ती फक्त पात्रे! कालच्या दिवशी घरातील सदस्यांना एक गमतीशीर टास्क मिळालं. पण सर्व सुरळीत चालेल ते बिगबॉसचं घर कसलं? अगदी ह्याच नुसार गमतीशीर टास्कचं रूपांतर गंभीर स्वरूपात झालं. काल घरातील सदस्यांना २ ग्रुप मध्ये व्हायचं होतं. एका ग्रुपला लहान बाळाची ऍक्टिंग करायची होती तर दुसऱ्या ग्रुपला त्या बाळाचं खेळणं होऊन बाळ जे करायला लावेल ते करायचं होतं. बाळ बनलेल्या सदस्यांनी खेळण्यांना चांगलंच सतवलं. त्यांना दिवसभर चालायला, नाचायला, मारून घ्यायला लावलं. रेशमने तर मेघाला पुरेपूर त्रास दिला. तिने तिच्याकडून खूप वेळ टाचा उचलून डान्स करून घेतला. मेघाच्या पायात रॉड बसवलेला आहे, पण तरीही रेशमने मेघाला जास्तीत जास्त त्रास होईल ह्याची काल पुरेपूर काळजी घेतली होती.

आता आजच्या दिवशी हेच टास्क चालू असणार आहे. पण आज अधिक उत्सुकता ताणून असेल. कारण कालच्या भागातील खेळणी आज बाळ तर कालची बाळ आज खेळणी होणार आहेत. आजच्या दिवशी हि बाळं आपल्याला बदला घेतांना दिसली. स्मिता पुष्कर कडून आज काही कृती करून घेत असतांना पुष्करला राग अनावर होऊन तो तिला बोलला ह्यावेळी खेळाचे नियम समजवून सांगण्यासाठी आस्ताद त्याच्यावर ओरडला. दोघांमध्ये काल चांगलीच ठिणगी पडली. जुईने सुद्धा सईकडून कालचा वचपा काढला. थोडक्यात काय तर ज्यांच्यात दोस्ती होती त्यांच्यात दुष्मनी झाली आणि ज्यांच्यात दुष्मनी होती ती आता ह्यानिमित्ताने अधिकच वाढली.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Television

To Top